Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी भास्कर मोरे अजूनही मोकाट; पोलिसांचे अपयश का राजकीय हस्तक्षेप? वाचा सविस्तर बातमी..

जामखेड लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी भास्कर मोरे अजूनही मोकाट; पोलिसांचे अपयश का राजकीय हस्तक्षेप? वाचा सविस्तर बातमी..

mahalokwaniBy mahalokwaniJune 25, 2023Updated:June 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:

या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा विनयभंग केल्या प्रकरणी संस्थाचालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर मोरे हे बऱ्याच दिवस जामखेड मधील विवाह समारंभात दिसून आले होते, गुन्हा दाखल होऊनही भास्कर मोरे हे जामखेड मध्ये वास्तव्यास होते , त्यांनी कोर्टालाही चुकीची माहिती देऊन, तात्पुरता जामीन मिळवला होता, त्यानंतर सर्व बाबी उघड झाल्यानंतर श्रीगोंदा कोर्टाने मोरेचा जामीन अर्ज फेटाळला.

यानंतर मोरेंनी औरंगाबाद खंडपीठात आपल्याला अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला, जामखेड पोलीसांनी केलेल्या जबाब, पंचनामे तसेच विविध सामाजिक संघटनांनी दिलेले निवेदने , उपोषणे , रास्तारोको यामुळे भास्कर मोरेचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला

सध्या भास्कर मोरेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला असून अटकेच्या भितीने मोरे फरार झाला आहे. यानंतर जामखेडमध्ये बऱ्याच मोठ- मोठ्या घटना घडल्या, व तसेच गुन्हे दाखल झाले जे गुन्हे दाखल झाले त्यातील गुन्हेगार सराईत असून त्यांना जामखेड पोलिसांनी अटक केली आहे, मंग भास्कर मोरे तर असे सराईत गुन्हेगार किंवा या अगोदर त्यांच्यावर गुन्हेही दाखल नसतील, त्यामुळे मोरेला जामखेड पोलिसांना पकडणे अवघड वाटत नाही , पण आत्तापर्यन्त जामखेड पोलिसांना भास्कर मोरे सापडत नाही, हे जामखेड पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल, नाही तर पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली या गुन्ह्याचा तपास करीत तर नाहीत ना याची पडताळणी होणे महत्वाचे आहे.

या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टाने ताशेरे ओढत सांगितले आहे कि, या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी, व सदर प्रकरणचा तसेच माघील काही ज्या घटना घडल्या आहेत, त्याची सखोल चौकशी करावी , असे आदेश असताना सुद्धा जामखेड पोलिसांना भास्कर मोरे सापडला नाही , जर जामखेड पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात काही स्थानिक अडचणी येत असतील, तर हा गुन्हा अहमनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, जेणे करून त्या पीडित मुलीला लवकर न्याय मिळेल , अशी मागणी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने होत आहे.


त्यानुसार आता भास्कर मोरेला अटक करण्याची मोठी जबाबदारी जामखेड पोलीसांवर आली आहे. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व या गुन्हाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांच्याशी संपर्क केला असता भास्कर मोरेला अटक करण्यासाठी जामखेड पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे , पण अध्याप पर्यंत मोरेला अटक करण्यास जामखेड पोलीस अपयशी ठरले आहेत, आत्ता हेच पाहणे आहे की, मोरे याला जामखेड पोलीस कधी अटक करतात? आणि त्या पीडितेला न्याय मिळवून देतात.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleKTM 200 Duke झाली नवीन फिचर्स मध्ये लाँच; जाणून घ्या किंमत डिजाईन.!
Next Article आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध- पोलीस निरीक्षक महेश पाटील
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.