जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
जामखेड शहरात आज रोजी मक्का मस्जिद येथे शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. तसेच बकरी ईद निमित्त एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी यांच्या

निवासस्थानी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच सर्व पाहुणे मंडळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कर्जतचे डी.वाय.एस.पी. वाखारे ,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी ,उपाध्यक्ष सय्यद मंजूर भाई,शेरखान भाई,आबिद खान ,सय्यद इस्माईल,सय्यद मुख्तार, नगरसेवक पवन राळेभात, अर्शद शेख,इमरान कुरेशी,नाझीम शेठ काझी,उमर कुरेशी, मजहर काझी,परवेज खान,शेख इस्माईल टेलर,आसिफ शेख आदी मुस्लिम पंच कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
