जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
अनंत चतुर्दशी निमित्त जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुक सोहळ्या निमित्ताने नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांचा माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मानाचा श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी रामचंद्र मित्र मंडळ,शिवशांती मित्र मंडळ,राजे शिवाजी युवा मंच, जयहिंद,विश्वक्रांती शिवशक्ती,वीरराजे, वस्ताद सत्ता, पृथ्वीराजे, शंभूराजे, जनविकास सेवाभावी संस्था, धर्मवीर, योध्दा, महासंग्राम , कान्होपात्रा,एस टी कामगार, जामखेड नगर परिषद कर्मचारी, महाराजा,तांडव, हनुमान, सिध्दीविनायक (मार्केट यार्ड), वक्रतुंड, सावतामाळी, जाणता राजा, रूद्राक्ष यांसह अनेक गणेश मंडळांचे नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या स्वागत कक्ष उभारून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गणेश प्रतिष्ठापना च्या दिवशी वरुणराजाचे देखील आगमन झाले.गेली १० दिवसांमध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.त्याचा एक भाग म्हणून आजच्या विसर्जन मिरवणुक सोहळ्या मध्ये युवकांसह अबालवृद्धांचा उत्साह दिसून येत आहे.आज या निमित्त सर्व गणेश भक्तांच्या पुढील वर्षभराच्या सुख समृद्धीसाठी गणराया चरणी प्रार्थना करत आहे.यावेळी आमदार प्रा राम शिंदे म्हणाले.
यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, नगरसेवक डॉ ज्ञानेश्वर झेंडे,प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी,पोपट राळेभात, ॲड. प्रविण सानप, संजय राऊत,मोहन (मामा) गडदे, लहु शिंदे शिवकुमार डोंगरे,श्रीराम डोके,मोहन देवकाते, डॉ.विठ्ठल राळेभात, गणेश राळेभात, पांडुरंग माने, संतोष गव्हाळे, बिट्टू मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार योगेश चंद्रे साहेब या मिरवणुक सोहळ्यासाठी प्रशासन व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवून विसर्जन सोहळा पार पाडला.
