महालोकवाणी न्यूज:-
जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार
जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय पाठीमागे बौध्दाचार्य बलभिम जावळे यांचे तथागत बुद्ध विहार येथे आज रोजी माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचं त्रिशरण पंचशील बौद्धाचार्य आयु. बलभिम जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पडला.
हे पण वाचा Balasaheb Thorat: ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरातांचा राजीनामा
यावेळी बौद्धाचार्य बलभिम जावळे म्हणाले,प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे पत्नीची खंबीर साथ होती त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व वैचारिक चळवळीला गतिमान करण्यासाठी माता रमाई ची खंबीर साथ लाभली.होती.
यावेळी मालनताई घायतडक,भारतीय बौध्द महासभेच्या तालुकाअध्यक्षा सुरेखाताई अनिल सदाफुले, शहराध्यक्षा सुरेखाताई रत्नाकर सदाफुले, वर्षाताई जावळे,नंदाताई गंगावणे , अरुणाताई सदाफुले , सदाफुले मामी ,कुसुमताई साळवे ,जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य बलभीम जावळे यांच्यासह बौद्ध उपासिका यांची उपस्थिती होती,
