जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार
जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील सारीका साडी सेंटरच्या पाठीमागे आबा समुद्र यांच्या घरासमोर
तळ्याचे रुप आले असून तेथील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.पावसाळ्याचे दिवस असून त्याठिकाणी पावसाचे पाणी साठत आहे. हे पाणी दूषित असून हे घरात नागरिकांच्या घरात जात असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येताना पाहायला मिळत आहे. हे दूषित पाणी घरात शिरल्यामुळे घरातील लहान मुले- वयस्कर मंडळी यांना साथीचे आजार होऊ शकतात, याला सर्वस्वी जबाबदार हे , जामखेड नगरपरिषद असणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .

फक्त 999 मध्ये Jio चा 4G फोन Jio Bharat V2 लाँच; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.!
या रस्त्यावर ये – जा करता येत नाही तसेच दुर्गंधी पसरली आहे.या पाण्यामध्ये गटार जवळ असल्याने मच्छर ,अळ्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.यामुळे डेंग्यू, ताप चे बरेच रुग्ण आढळले आहे,या संदर्भात जामखेड नगर परिषदेला अर्ज व मुख्याधिकारी यांना भेटून ही कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही अशी माहिती तेथील रहिवासी नागु गायकवाड यांनी दिली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येताना दिसत आहे
या ठिकाणच्या रहिवाशी रुपाली पवार म्हणाल्या की, मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत आहे, तसेच मुलं आजारी पडली आहे, आमच्या प्रश्नांची जामखेड नगर परिषद दखल घेत नाही.आम्ही माणसं नाहीत का? मुलांचे आरोग्य धोक्यात असून यास जबाबदार कोण?
आम्ही वेळोवेळी या संदर्भात जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटून अर्ज व विनंती केली आहे , पण त्यावर त्यांनी अद्याप पर्यंत काहीच निर्णय घेतलेला नाही, पावसाला सुरवात झाली आहे, त्यामुळे हे काम होणे महत्वाचे आहे, जर हे काम तात्काळ मार्गी न लावल्यास येथील सर्व नागरिक घरासमोरील साचलेल्या पाण्यामध्येच बसून उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे , यावेळी तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
