धनराज पवार
पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत जामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक अनिल भारती तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं.
[better-ads type=’banner’ banner=’7092′ ]
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे,अनुराधा अडाले,अनुष्का वारे,संगीता तोरडमल,रंजना पवार,स्मिता गुलाटी,शुभांगी नांनवरे. प्रीती सदाफुले आदी महिला कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होत्या.
वैशाली शिंदे म्हणाल्या की,अतिशय खडतर आयुष्य असलेल्या, रात्र आणि दिवसाची पर्वा न करता अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या तसेच कुटुंबासाठीही पुरेसा वेळ देऊ न शकणाऱ्या नैसर्गिक आपत्ती मधे जीवाची पर्वा न करता रक्षण करणाऱ्या अशा या पोलीस भावास राखी बांधणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे तसेच आमच्या पोलीस भगिनी या सुद्धा परोपरीने समाजाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत त्यांना सुद्धा कृतज्ञता म्हणून राखीचे पवित्र बंधन बांधणे आमचे कर्तव्य आहे.
[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]
पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, समाजाचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे ते आम्ही परोपरीने पाळत आलो आहे. आमच्याविषयी आस्था बाळगून आलेल्या भगिनींना मी धन्यवाद देतो.
