धनराज पवार
जामखेड | जामखेड शहरात नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. आमदार रोहित पवार मित्र मंडळ व जामखेड तालुक्यातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. हजारोंच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावर पार पडला.
कळंबोली येथील जय श्रीराम बाल गोविंदा पथकाने कोरले बक्षीसावर आपले नाव
यावेळी आमदार रोहित पवार, श्री नागेश विद्यालय चे प्राचार्य बि.के.मडके, प्रा.मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, प्रकाश सदाफुले, सभापती राजश्रीताई मोरे, सुर्यकांत मोरे, संजय वराट,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल आहिरे,तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, उमरभाई कुरेशी, रमेश आजबे, रविंद्र कडलग, बाबासाहेब मगर,नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, महादेव डूचे सर, राहुल बेदमुथा,ॲडव्होकेट हर्षल डोके,शरद शिंदे, कुंडल राळेभात,युवा नेते महेंद्र राळेभात, महेश राळेभात,प्रविण उगले, सरपंच नरेंद्र जाधव, बापूसाहेब कार्ले, बाळासाहेब खैरे, निलेश पवार,दिपक नेटके, बापूसाहेब शिंदे,अभय शिंगवी, अमोल गिरमे, पिंटूशेठ बोरा, काकासाहेब कोल्हे, हरिभाऊ आजबे, रामहरी गोपाळघरे, महेश यादव, सचिन डोंगरे,विशाल गव्हाळे, सचिन शिंदे, गणेश हगवणे, वसिम सय्यद, बिलाल शेख, इमरान तांबोळी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्यंत उत्साहात जय श्रीराम बाल गोविंदा पथक या मंडळाने यंदाची नागेश विद्यालयाच्या मैदानावर असलेली हंडी फोडून बक्षिसावर आपलं नाव कोरलं. विजयी झालेल्या कळंबोली (पनवेल) येथील मंडळाला १ लाख ११ हजार १११ रुपये रोख बक्षीस म्हणुन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच अशाच पद्धतीने मतदारसंघातील मुला मुलींसाठी देखील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनाही आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या वर्षी मात्र नागरिक, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांनी मिळून भव्य दही हंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. हजारोंच्या संख्येनं परिसरातील नागरिक, महिला, अबालवृद्ध असे सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला आणि मुलींची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले कारण महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली होती.
