Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड – “स्नेहसंमेलनाचा सोहळा”; ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार !

जामखेड – “स्नेहसंमेलनाचा सोहळा”; ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार

नटून-थटुन जमले सारे,
गाणे वाजते,बक्षीस मिळते
स्पर्धांचा या डौलच न्यारा,
शिक्षक सारे प्रसन्न हसती
म्हणुनी शाळा नंदनवन भासते !

या उक्तीप्रमाणे प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणदर्शनाने, जामखेड शहरातील बिड रोड येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन आदित्य गार्डन च्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे व सौरभ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्या मनात दडलेल्या सुप्त प्रतिभेला नवे वळण देऊन काहीतरी नावीन्यपूर्ण घडविण्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न करावा असे मत गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी व्यक्त केले. यावेळी प्री-प्रायमरी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध नृत्याचे कार्यक्रम सादर केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गाणी,

स्वागत नृत्य,थीम डांस –मोबाईलचा अतिवापर ,स्पर्धात्मक शिक्षण व त्याचा विद्यार्थ्यावर होणारा परिणाम, धार्मिक, आधुनिक नृत्यप्रकार , बहुभाषिक गीतगायन ,देशभक्तीपर गीत, सिनेमा गीते, मराठी लोकगीते, नाटिका,सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी SHIPS- Its Myrial Colors या थीमवर आपली प्रतिभा दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. होतकरू मुलांनी रंगमंचावर सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालक व शहरातील ग्रामस्थ, युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल चे संचालक प्रा.कैलास माने सर, सौ.वर्षा कैलास माने,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, डॉ. अल्ताब शेख, डॉ. सादेख पठाण ,शिवसेना शहराध्यक्ष देविदास भादलकर, युवा सेना तालुका प्रमुख सुमित वराट, शिव व्याख्याते प्रा. जाकीर शेख सर,हसनभाई तांबोळी, जुबेर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिन्सिपल आरोरा व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आरोरा मॅडम तर सूत्रसंचालन विजयकुमार जाधव सर यांनी केले व आभार अनिल डोके सर यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बहारदार कवी संमेलन संपन्न !
Next Article निवडणूक आयुक्त नेमणूक प्रक्रिया बदलली; सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सर्वात मोठा दणका !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.