राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक राहिलेले पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

वैभव कदम हे काही काळ जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक होते. अनंत करमुसे प्रकरणात वैभव यांची सतत चौकशी सुरू होती. आज अचानक वैभव यांनी आत्महत्या केली. वैभव यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. वैभव कदम असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज सकाळी वैभव कदम यांनी रेल्वेसमोर उडी मारून जीवन यात्रा संपवली.
आज सकाळी निळजे – तळोजा रेल्वे ट्रॅक दरम्यान वैभव कदम जखमी अवस्थेत आढळले होते त्यांना दिवा हॅास्पिटल येथे नेले असता मृत घोषित केले त्यांचा मृतदेह पोस्टमार्टम करता ठाणे सिव्हिल हॅास्पिटल येथे आणण्यात आला, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. वैभव कदम यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ठाणे सिव्हिल हॅास्पिटलला आणण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
