डाँ जाहेद बागवान सर हे न्यु इंग्लिश राजुरी येथे शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
डाँ जाहेद बागवान सर,हे दरवर्षी”बकरीद ईद ” साजरी करून “आषाढी एकादशीला ” ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्था,साईबाबा मंदीर राजुरी येथे आषाढीला पंगत देतात व स्वाता पंगतीला हाजर राहुन अभंग व हारीपाठा मधे सहभागी होतात या मधुन ते हिंदु – मुस्लिम एकतेचा संदेश देतात.
ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ. प. गुरूवर्य नारायन महाराज दौंड़ हे डाँ जाहेद बागवान सर यांचा शाल व श्रीफऴ देऊन आभार व्यक्त करतात.ज्ञानकैवल्य वारकरी शिक्षण संस्थे मधे इयत्ता ३ री ते १० वी पर्यंत चे ६० ते ७० विद्यार्थ्यी हे आध्यात्मिक शिक्षण घेतात.

डाँ जाहेद बागवान सर यांना पुर्वी पासुनच आध्यात्मिकतेची आवड आसुन ते निसर्गोपचार तज्ञ देखील आहेत.त्याच प्रमाणे ते व्यसनमुक्ती भारत व मधुमेह मुक्त भारत अभियान या मधे सामाजिक कार्य देखील करतात.
या सर्व उपक्रमातून सरांनी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे
