महालोकवाणी न्यूज:
नगर – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपाला आलेले आहे. महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कायम प्रयत्नशील आहे. संशोधकांना आधुनिक सुविधासाठी निधी उपलब्ध करुन देत असल्याने विद्यार्थ्यांचा या शिक्षण संस्थेकडे कायम ओढा राहिलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याची माहिती प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखले जाणारे डॉ.विखे पाटील महाविद्यालयाचे नाव सर्व कसोटींमध्ये सिद्ध झाले आहे. अशा या महाविद्यालयाचे मुल्यमापन करुन मानांकन देण्यासाठी शुक्रवार दि.10 व 11 फेब्रुवारी रोजी दोन दिवस राष्ट्रीय ‘नॅक’ कमिटीद्वारे मुल्यमापन होणार आहे, असे विखे फौंडेशनचे उपसंचालक सुनिल कल्हापुरे यांनी सांगितले.
डॉ.विखे पाटील महाविद्यालयात प्लेसमेंटची परंपरा सातत्याने जपत आहे. अत्याधुनिक सुविधा, अद्यावत प्रयोगशाळा, उच्चशिक्षित शिक्षकवर्ग, प्रशस्त इमारत, नवनवीन विषयांवर कार्यशाळा, तज्ञांचे सेमिनार अशी ख्याती असल्याचे प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी सांगितले.
दोन दिवस होणार्या नॅक चे मुल्यमापना करिता महाविद्यालय सर्व कसोट्यांसाठी सज्ज आहे. या उपक्रमास डॉ.विखे पाटील. संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पा., मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे व प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी.एन.गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
