Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकचे ए+ मानांकन

डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकचे ए+ मानांकन

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 16, 2023Updated:February 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व्यवस्थापनकायम प्रयत्नशील – अ‍ॅड.वसंतराव कापरे

महालोकवाणी न्यूज:
नगर – डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे अभ्यासक्रमाचे विविध पैलू शिकविण्याची व शिकण्याची आधुनिक पद्धत तसेच संशोधनातील नविनता व त्याचा विस्तार, शिक्षण संसाधने आणि विद्यार्थ्यांच्या आधुनिक विषयातील प्रगतीसाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असल्याने महाविद्यालयास ए+ मानांकन मिळाले ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन फौंडेशनचे विश्वस्त अ‍ॅड.वसंतराव कापरे यांनी केले.


विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक कमिटीचे ए+ मानांकन प्रमाणपत्र मिळाले याप्रसंगी फौंडेशनचे उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, डॉ.अंकुश शिर्के, डॉ.रविंद्र नवथर, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अ‍ॅड.कापरे पुढे म्हणाले, नॅशनल व इंटरनॅशनल स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन आणि रिसर्च पब्लिकेशनला आर्थिक मदत, शिक्षण पद्धतीच्या विकासासाठी आधुनिक पद्धतीचा वापर, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट, सर्व कंपन्यांशी सामंजस्य करार यासर्व बाबींसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अहोरात्र प्रयत्न केले असल्याने नॅक कमिटीने मुल्यमापन करीत ए+ मानांकन दिल्याने या सर्वांचा सन्मान झाला, असे वाटते.


प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी महाविद्यालयात उपलब्ध सोयीमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा, व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा, प्रोजक्ट कॉम्पिटेशन, तांत्रिक पेपर सादरीकरण, संस्थात्मक मुल्ये आणि त्यांचा योग्य वापर या मुख्य बाबींचा नॅक कमिटीने मुल्यामापन केले आणि यासर्व कसोट्यांवर महाविद्यालयाला ए+ मानांकन मिळाले, असे ते म्हणाले.
याप्रसंगी कमिटीने माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व प्रतिक्रिया नोंदविल्या. दोन दिवस या मुल्यमापन सर्वेक्षणात कमिटीने विविध विभागाला भेटी देऊन होस्टेल, कॅन्टीन, सोयी-सुविधा याचे निरिक्षण करुन सर्वेक्षणात बाबी नोंदविल्या, असे प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी सांगितले.


महाविद्यालयातील मुल्यामापन तपासणी आणि नॅकच्या तयारीसाठी संचालक डॉ.अभिजित दिवटे, प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी.एम.गायकवाड यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाला मिळालेल्या या ए+ मानांकनाबद्दल फौंडेशनचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पा., माजी जि.प.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ. सुजय विखे पा., अ‍ॅड.वसंतराव कापरे यांनी सर्वांचे अभिनंदन, कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवीर वाजेकर महाविद्यालयात वाजेकर पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
Next Article Udhav thackeray- Eknath shinde महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.