Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ. सुधा कांकरिया दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित..

डॉ. सुधा कांकरिया दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 17, 2023Updated:August 17, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा इथे सन्मान करण्यात आला. अध्यक्ष स्थानी श्री जगदीश यादव चेअरमन ओबीसी कमिशन गव्हर्मेंट ऑफ एनसीपी ऑफ दिल्ली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कमिशन सदस्य भरत जा व कॉर्डिनेटर अनुप चावला व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. सुधा कांकरिया स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक

अहमदनगर : येथील स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांना दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने चेअरमन कमिशन गव्हर्मेंट ऑफ एनसीपी ऑफ दिल्ली जगदीश यादव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर समारंभ दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा इथे सन्मान करण्यात आला. अध्यक्ष स्थानी श्री जगदीश यादव चेअरमन ओबीसी कमिशन गव्हर्मेंट ऑफ एनसीपी ऑफ दिल्ली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कमिशन सदस्य भरत जा व कॉर्डिनेटर अनुप चावला व्यासपीठावर उपस्थित होते.

Table of Contents

    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन व देशभक्तीपर गीताने झाली यावेळेस अनुप चावला यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री जगदीश यादव म्हणाले की देशाची एकता व अखंडता अबाधित राहिली पाहिजे. या देशात राहणारे सर्व एकमेकांचे बांधव आहेत. कुठल्याही जाती धर्माचा असो परंतु सर्वांच्या रक्ताचा रंग हा सारखाच असतो. राष्ट्रीय एकात्मता जपणे हे सर्वांचे कर्तव्य असून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देश बळकट करणाऱ्या व देशाची ताकद वाढविणाऱ्या सर्वांचा आज सन्मान होत आहे ही आनंदाची बाब आहे पुरस्कार निवड समितीच्या वतीने डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला ते म्हणाले डॉ. सुधा कांकरिया या नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवे बरोबर त्या स्त्रीजन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत. 1985 साली देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरूवात डॉ. सुधा ताईंनी केली.

    Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

    याची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये सन्मानपूर्वक डॉ. सुधा कांकरिया आद्य प्रवर्तक बेटी बचाओ चळवळ (The First Proto Originator of Save Girl Child Mission in India) अशी करण्यात आलेली आहे. तीन तपापेक्षा जास्त त्यांची ही तपश्चर्या आहे. दोन राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या कार्याचे कौतुक झाले. 2007 साली अब्दुल कलाम यांच्या वतीने निर्मलग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2008 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रत्यक्ष भेटीत चळवळीचे कौतुक केले. युरोप येथील युनिर्वसिटी ऑफमाऊंटन्सच्या वतीने डॉ. सुधाताईंना वुमन एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल पब्लीशींग हाऊस ने सुध्दा मॅन ऑॅफ अचिव्हमेंट या महत्वपूर्ण ग्रंथामध्ये त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार, रमाबाई आंबेडकर पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदि 150 पेक्षा जास्त पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. सुधाताईंच्या समाजसेवेच्या उत्तुंग भरारीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकीटावरही उमटले. ’डॉ. सुधा कांकरिया’ नांवाचे पोस्टाचे तिकीटही प्रसिध्द झाले ही किती गौरवाची बाब आहे. महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. सुधाताईंना नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाईल्ड मिशन इन इंडिया सन्मान प्राप्त झाला आहे. चळवळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाखो स्त्रीभ्रुण वाचले जाण्यात सुधाताईंच्या कार्याचा महायज्ञ व तप कारणीभूत ठरले आहे. याची नोंद इतिहास मात्र निश्चीत घेणार आहे.


    पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना डॉ सुधा कांकरिया म्हणाल्या की भारत मातेचे आपण सर्व लेकरं आहोत मग मुलगा मुलगी भेद कशा साठी? स्त्रीभ्रूणहत्या झाल्यामुळे मुला मुलींच्या संख्येत तफावत निर्माण झाली आहे. आज मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत परिणामी आज स्त्रीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे सर्व ताबडतोब थांबविण्याची गरज आहे. यासाठी मी गेल्या चार दशकापासून कार्य करीत आहे. समाज मनाच्या मानसिकतेमध्ये बदल होणे आवश्यक आहे तसेच कायद्याची अंमलबजावणी ही चोख व्हायलाच पाहिजे.

    आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुण वयातच विवाह करतानाच सात फेऱ्यांबरोबर आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला तर मुलीच्या स्वागताचे व सन्मानाचे बीज तेव्हाच समाज मनात कोरले जाईल व भविष्यात होणाऱ्या स्त्रीभ्रूणहत्या आपल्याला रोखता येतील. गेल्या काही वर्षात 11 हजार पेक्षा जास्त वधू-वरांनी आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला आहे आता थोडे वातावरण सकारात्मक होऊ पाहत आहे असे प्रतिपादन पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. सुधा कांकरिया यांनी केले व उपस्थितांना स्त्री जन्माच्या स्वागताची शपथ दिली. मान्यवरांची शुभेच्छा पर भाषणे झाली वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleमहावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन सर गायवळ यांची सदिच्छा भेट,
    Next Article अहमदनगर शहरात बिबट्याचे दर्शन; या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान.!
    mahalokwani
    • Website

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.