कांदिवली प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका चिमुकल्यांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
लहान मुलांना शाळेत कसं वागवावं याबाबत अनेक संकेत तसंच नियम आहेत. पण, शिक्षकांकडून त्या नियमांचं सर्रास उल्लघन होतं.मुबई कांदिवली भागातही एक अशीच धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या शाळेतील दोन शिक्षिकांनी मुलांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघड झालीय. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल
मुंबईतील कांदिवली पश्चिममधील प्री स्कुल शाळेतील हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये दोन महिला शिक्षक मुलांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यांना वर्गात मारल्याचं आणि जमिनीवर आदळल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय
मुंबईच्या शाळेतील हा व्हिडीओ पाहून तुमची मुलं किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल.#Mumbai #Local18 #News18Lokmat #MarathiNews https://t.co/xWWGw5BIUN
— News18Lokmat (@News18lokmat) April 5, 2023
जीनल शहा आणि भक्ती छेडा असं सीसीटीव्हीत मारहाण करताना दिसलेल्या शिक्षिकांची नावं आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली असून मुंबई पोलीस पुढील तपास करीत

