पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे
अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानेमौजे अंजनगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर दिनांक 07 ते 13 जानेवारी पर्यंत संपन्न ह़ोत आहे तसेच. माननीय प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ.चंद्रकांत कांबळे डॉ. विलास वसंतराव कर्डिले,

जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सह १५० स्वंयसेवकांसह आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी, स्मशानभूमी परिसर स्वच्छता’ ग्राम स्वच्छता व जळगाव ते बऱ्हाणपूर तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये अंजनगाव शिवारात 500 चिंचेची झाडे लावून शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहे.

आज या निवासी शिबिर स्थानाला भेट देत असताना सोमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय अनिल साळुंखे सर तसेच महाविद्यालयातील इतर सर्व सहकारी वर्ग व विद्यार्थी मित्र यांनी विशेष प्रयत्न केले.
