गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना भुरळ घातली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावचा कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिलं निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडले, त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. त्यानंतर आता गौतमी पाटीलचा व्हिडीओ समोर आला आहे.

पूर्वी मी चुकले होते आणि त्यासाठी वारंवार माफी देखील मागितली आहे. आता मी माझ्या नृत्यशैलीमध्ये, वेशभूषेमध्ये बदल केला. अजितदादा खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. दादा मी चुकले पण आता मी माफी मागते, असं म्हणत गौतमीने Gautami Patil माफी मागितली

अजित पवार काय म्हणाले होते
‘राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं अजितदादा म्हणाले होते.
