Delhi: दिल्लीमधील नववर्षाच्या रात्री झालेल्या भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच राजधानी दिल्लीमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याने तरुणाने तरुणीवर सपासप वार केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना सोमवारी दिल्लीच्या आदर्शनगर भागात घडली असून युवतीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. (Delhi Crime)
महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी !
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही दिल्ली विद्यापीठात बी.ए.चे शिक्षण घेत होती; 5 वर्षांपूर्वी तिची सुखविंदरशी मैत्री झाली. दोघांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले होते. मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच मुलीने स्वतः हून सुखविंदरपासून लांब राहायला सुरूवात केली. मात्र या गोष्टीचा सुखविंदरला राग आला होता. याच रागात त्याने मुलीवर हल्ला केला.
सोमवारी त्याने पीडित मुलीला ब्रेकअपचे कारण जाणून घ्यायचे असल्याचे सांगत भेटायला बोलावले. यावेळी त्याने मुलीवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीच्या बाबू जगजीवन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीटीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये सुखविंदर मुलीवर हल्ला करताना करताना दिसत आहे. मुलीच्या मानेवर, पोटावर आणि हातावर अनेक जखमा झाल्याचेही पाहायला मिळत आहे. हल्ला केल्यानंतर मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. परिसरातील शेजाऱ्यांनी गोंधळ ऐकून सिमरजितच्या मदतीसाठी धाव घेतली.
