Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भाजपाने सोपवली ही मोठी जबाबदारी; वाचा..

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भाजपाने सोपवली ही मोठी जबाबदारी; वाचा..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 4, 2023Updated:August 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बबनराव धायतोंडे

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.


भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राहुल कुल यांची जिल्हा समन्वयक म्हणून दि.4 रोजी निवड करण्यात आली आहे .

भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे. यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे . यावरून एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.


आमदार राहुल कुल यांच्याकडे यापूर्वी बारामती लोकसभा निवडणूकप्रमुख पदाची जबाबदारी असून आत्ता पूर्ण ग्रामीण जिल्ह्याची समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे बळ मिळणार आहे.


या निवडीबाबत आमदार राहुल कुल यांना विचारले असता ते म्हणाले की , भारतीय जनता पार्टीने माझ्यावर संघटनात्मकरुपी समन्वयाची जबाबदारी दिली असून ही दिलेली जबाबदारी मी निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे.केंद्र व राज्य सरकारची विकासाची कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोचविले जातील याबाबत संघटनात्मक रचना करून ही कामे पोहचविली जातील .

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारी नेमणुकी नंतर पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर जिल्हा समन्वयकाची जबाबदारी दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानून त्यांनी दिलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagpanchimi| जामखेड येथे नागपंचमी यात्रे निमित्ताने शांतता नियोजन बैठक संपन्न; गुंडांना हद्दपार केले जाणार..
Next Article उडीद पीक नुकसानीचे पंचनामे व नुकसान भरपाई करा – मंगेश आजबे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.