महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष मा.वासुदेव काळे यांची माहिती
महालोकवाणी न्यूज: पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
पुणे जिल्ह्यातील व्यवहारीक आणि हुशार
शेतकरी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन घेण्यासाठी आतुर असलेला तरुण वर्ग राजकिय, सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचे भान असलेला नागरीक दौंड ,कृषि महोत्सव या प्रदर्शनाचे स्वागत उत्सुकतेने करत आहे. सुमारे २ लाख लोकांची या प्रदर्शनास भेट अपेक्षित आहे. त्यामुळे दौंड कृषि महोत्सव हे एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणार यात कोणतीही शंका नाही. येथील शेतकऱ्याशी आपला थेट होणारा संवाद या निमित्ताने साधत आहोत.

दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रकिया सहकारी संस्था ही सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार, व्यावसायिक प्रशिक्षण आदी क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करीत आहे. जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन २०२3 चे संस्थेने महत्त्वकांक्षी आयोजन केलेले आहे. या निमित्ताने परिसरातील शेतकऱ्यामध्ये नवतंत्रज्ञानाची ओळख व्हावी. ही संकल्पना त्यामागे आहे.
.
या निमित्ताने परिसरातील शेतकऱ्यामध्ये नवतंत्रज्ञानाची ओळख व्हावी. ही संकल्पना त्यामागे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषि कल्याणकारी योजनांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे.
त्याचबरोबर महिला बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या प्रदर्शनात होणार
आहे. या हेतूने या प्रदर्शनाची संकल्पना मांडत आहे. भविष्यात असे अनेक विविध समाज उपयोगी उपक्रमाची नांदी या निमित्ताने होत आहे. या उपक्रमास सुरुवात करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
यामध्येखाजगी संस्था, शासन, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांचा सहभाग लाभेल ही अपेक्षा.या प्रदर्शनात विविध मान्यवरांचा सहभाग त्यांचा शेतकरी बांधवांसोबत होणारा संवाद हा सुवर्ण कांचन योग या निमित्ताने होत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी.
