पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे .
दौंड शुगर :-.कारखान्याच्या वतीने महिलांचा अभ्यास दौरा आयोजित.करण्यात आला. परिसरातील महिला शेतकऱ्यांना मांजरी, पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे १ दिवसीय प्रशिक्षण व पाहणी दौऱ्यासाठी पाठवण्यात आले.

शेतकरी बांधवांबरोबरच महिला भगिनी देखील शेती आणि शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी सक्षम झाल्या पाहिजे. त्यासाठी दौंड शुगर च्या वतीने वेळोवेळी योग्य ते उपक्रम राबवले जातात.
ऊस उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारच्या योजना व उपक्रम दौंड शुगर च्या माध्यमातून नेहमीच राबवले जातात. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ ऊस उत्पादनासाठी घ्यावा असे आवाहन दौंड शुगरचे संचालक विरधवल जगदाळे पाटील यांनी केले. शेतकरी बांधवांंबरोबरच महिला भगिनी शेतकरी सक्षम होण्याकरता दौंड शुगर कटीबद्ध राहील असा विश्वास देखील जगदाळे यांनी दिला.
यावेळी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड, दौंड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ हेमलता फडके, शेती अधिकारी श्री दिपक वाघ, कृषी विकास अधिकारी श्री संदेश बेनके,व अनेक परिसरातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या.
