Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाची बनवाबनवी; शिक्षक मान्यता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल ?- राम खाडे

नगरमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाची बनवाबनवी; शिक्षक मान्यता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल ?- राम खाडे

mahalokwaniBy mahalokwaniMay 7, 2023Updated:May 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर :- शिक्षणाधिकारी ( मा.) कार्यालय येथील तत्कालीन अधिकारी कर्मचारी यांनी संस्थाचालक व शिक्षक यांना हाताशी धरून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक भरतीस सन 2012 नंतर बंदी असतानाही शिक्षकांना मान्यता देऊन कोटीचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बळ तर्फ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त यांच्याकडे पुरावासह तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

हे नक्की वाचा

अहमदनगरमध्ये मिसाळ सरांचे RM एज्युकेशन ठरत IIT JEE – NEET- CET च्या तयारीसाठी अव्वल ;प्रवेश देणे चालू


याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ ता. राहुरी जि. अहमदनगर संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल,सडे, ता. राहुरी हे अनुदानित माध्यमिक कार्यालयात कार्यरत आहे. श्री गडाख उत्तम सुभाष, शिक्षण सेवक ओबीसी बीए बीडी यांची नियुक्ती दि.08/12/2012 पासून मान्यता देण्याबाबत क्रमांक संक्रिन 2019/ ( स. क्र.478) टी एन टी -1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई 32 दि. 15 जानेवारी 2019 चा बनावट आदेशानुसार शिक्षणाधिकारी ( मा ) यांनी जा. क्र./ कार्या 6 – वै. मान्यता / 203/ 2019 अहमदनगर दि.02/ 08/2019 च्यां आदेशान्वये श्री गडाख उत्तम सुभाष यांना दिनांक 10/12/2012 पासून वैयक्तिक शिक्षण मान्यता देण्यात आली व त्यानुसार त्यांची फरकाची रक्कम ही काढण्यात आली.

हे नक्की वाचा

जामखेड मध्ये शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना; संस्थाचालाविरुद्ध विद्यार्थिनीनेच केला विनयभंगाचा गुन्हा दाखल.!


सदरची माहिती राजेश शिंदे रा. मांडवे, ता. पाथर्डी यांना समजल्यानंतर त्यांनी दिनांक 15 जानेवारी 2019 च्या मंत्रालयीन आदेशाची माहितीच्या अधिकारास दिनांक 12/03/2021 व 17/06/2021/प्र. क्र.16/ टीएनटी -1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 22 जून 2021 च्या पत्राद्वारे पत्र क्रमांक संकीर्ण – 2019/ सं. क्र.478/ टीएनटी -1 अशा क्रमांकाचे पत्र दिनांक 15 /01/ 2019 रोजी कार्यसनामार्फत निर्गमित झाल्याचे आढळून येत नाही असे कविता तोडे, जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी यांनी राजेंद्र शिंदे यांना कळविले.


त्यानंतर तक्रारदार राजेंद्र शिंदे यांनी शिक्षणाधिकारी (मा. ) यांना तक्रार अर्ज दिले, तसेच शिक्षण आयुक्त, उपसंचालक यांना अनेक वेळा तक्रार अर्ज दिले. चौकशी झाल्याचे नाटक केले जाते. परंतु आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही.
तात्कालीन शिक्षण राज्यमंत्री मा. नामदार बच्चू कडू यांना अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई – 32 यांना दि.09/12/2021 रोजी पत्र देऊन सदरचा आदेश बनवट सहीचा असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला. परंतु आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्यावर एक महिन्यात कारवाई करावी अन्यथा माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राम खाडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगरमध्ये मिसाळ सरांचे RM एज्युकेशन ठरत IIT JEE – NEET- CET च्या तयारीसाठी अव्वल ;प्रवेश देणे चालू
Next Article पाथर्डी भगवानगड व ४६ गाव पाणीपुरवठायोजना काम बंद करण्याची वेळ ?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.