Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगर जिल्ह्यातील धर्मांतर प्रकरण विधानसभेत गाजले, पोलिस निरीक्षकाची बदली आणि चौकशी !

नगर जिल्ह्यातील धर्मांतर प्रकरण विधानसभेत गाजले, पोलिस निरीक्षकाची बदली आणि चौकशी !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 23, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला पाठीशी घातल्याचे प्रकरण राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर शेकले आहे. हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक दराडे यांची येत्या पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याच्या सूचना प्रभारी गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत दिल्या. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी याविषयावर अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.

एप्रिल २०२२ मध्ये राहुरी तालुक्यातील ही घटना उघडकीस आली होती. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात आठ महिन्यापूर्वी पंजाब मधील कमलसिंग नावाच्या ख्रिश्चन मिशनऱ्याने एका भाजीविक्रेत्या महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे.

यासंबंधी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी लक्ष दिले नाही. पुढे भाजपचे आमदार नितेश राणे आणि खासदार अमर साबळे यांनी या लक्ष घातले. त्यांनी अहमदनगरला येऊन मोर्चात काढला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन राहुरीतील या धर्मांतराच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

हा विषय आता अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोणतीही कारवाई न करता गुन्हा दाखल होऊनही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. गेली आठ महिने हा आरोपी मोकाट असून शिथिल कलमे लागू केल्याने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात या आरोपीने हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना पण केलेली आहे. त्यामुळे या आरोपीवर व त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी लक्षवेधी मांडताना केली. त्यावर मंत्री देसाई यांनी हा आदेश दिला.

काय आहे मूळ प्रकरण

संबंधित महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. आरोपी कमलसिंग ३ एप्रिलला या महिलेच्या घरी गेला. तिला एका विशिष्ट धर्मात येण्याचा आग्रह धरला. धर्मांतर केल्यास तुम्हाला प्रति महिना दोन हजार रुपये मिळतील, घरातील देवांच्या मूर्ती पाण्यात विसर्जित करा, असे सांगून धर्मांतरासाठी कमलसिंगने त्या महिलेला एका चारीजवळ नेले. चारीतील पाण्यात महिलेला उतरण्यास सांगून तिचाशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारानंतर महिला तेथून निघून जाऊन गावात आली आणि तिथे तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कमलसिंग नावाच्या व्यक्तीकडून होत असलेल्या धर्मांतराच्या प्रचाराला वाचा फुटली. कमलसिंग (सध्या रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, मूळ रा. पंजाब) याच्याविरुद्ध संबंधित महिलेने फिर्याद दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनेजल व्हॅक्सिनला केंद्र सरकारची मंजुरी, कोणाला घेता येणार ही लस? कुठे करावी नोंदणी?
Next Article ईंदापूर येथिल क्षीरसागर विद्यालयात ब्युटी पार्लर कोर्स चे प्रशिक्षण सुरू
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.