मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे उद्या उपस्थित असणार आहेत. यावेळी खडसे यांची पंकजा मुंडे, त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे,

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उद्या भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या भेटीआधी एका न्यूज चॅनेल’ला प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा यांनी नुकतंच मी भाजपची नाही तर भाजप पक्षात मी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. “भाजपमध्ये अस्वस्थथा आहे”, असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं आहे.
