Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पती हत्येच्या गुन्ह्याखाली तुरुंगात होता. ८ महिन्यांची गर्भवती पत्नी त्याला भेटायला गेली मात्र, ही भेट अखेरची ठरली. तुरुंगात पत्नीसोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.!

पती हत्येच्या गुन्ह्याखाली तुरुंगात होता. ८ महिन्यांची गर्भवती पत्नी त्याला भेटायला गेली मात्र, ही भेट अखेरची ठरली. तुरुंगात पत्नीसोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीला भेटायला गेली. पतीला पाहताच ८ महिन्यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली आहे. ही महिला ८ महिन्यांची गर्भवती असून येत्या २० दिवसांनी २७ जूनला तिची प्रसूती होणार होती. दीराने वहिणीच्या मृत्यूसाठी पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. भागलपूर येथील विशेष मध्यवर्ती कारागृहात या महिलेचा पती असल्याची माहिती आहे.


भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात ६ जून रोजी ही हृदयद्रावक घटना घडली. भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचा विवाह घोघा जानिडीह येथील पल्लवी यादवसोबत २ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि पल्लवी ही ८ महिन्यांची गर्भवती होती

गुड्डू ३०७ प्रकरणी तुरुंगात
गुड्डू यादवचा विनोद यादवशी जमिनीवरुन वाद होता. या प्रकरणी गुड्डूवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो गेल्या आठ महिन्यांपासून भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.


पल्लवीसह गर्भातील बाळाचाही मृत्यू
६ जूनला पल्लवी पती गुड्डूला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचली होती. गुड्डू तिच्या समोर येताच पल्लवी बेशुद्ध होऊन कोसळली. यानंतर तिला तात्काळ मायागंज रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पल्लवीच्या मृत्यूसोबतच तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. पल्लवीला आठवा महिना सुरु होता. डॉक्टरांनी तिला २७ जून ही प्रसूतीची तारीखही दिली होती. पण, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे, गुड्डूचा भाऊ विक्की यादवने वहिणीच्या मृत्यूला पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दुसऱ्या पक्षाकडून पैसे घेऊन माझ्या भावाला तुरुंगात टाकलं, असा गंभीर आरोप त्याने केला आहे. जर, भाऊ तुरुंगात नसता तर ही परिस्थिती आली नसती. आमचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं आहे, असं त्याने सांगितलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराम शिंदेचे पुन्हा कर्जत-जामखेड मतदार संघात वर्चस्व; रोहित पवार बॅकफूटवर.!
Next Article सभागृह नेते विनित पाउलबुधे यांना पत्नीशोक सौ.सुजाता पाउलबुधे यांचे अल्पशा आजाराने निधन.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.