पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे
अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आज (ता.२७)रोजी दुपारी १वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ता.पाटोदा,जि. बीड येथून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे संयुक्त विद्यमाने हेलिकॉफ्टर मधून चिंचपूर पांगुळ येथे आयोजित सप्ताहासाठी आणल्या आहेत.
या प्रसंगी शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेचभगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते.
गावातून बँड, टाळ,मृदुगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी एक वाजता हेलिकॉपटर ने मंडपावर पुस्पवृष्टी करण्यात आली. आजपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. आठ दिवस काकडा,रामकथा,हरिपाठ प्रवचन,कीर्तन,जागर,आदी कर्यक्रम होणार आहेत.दरम्यान आज रात्री ९ते११या वेळेत आदिनाथ महाराज लाड आळंदी देवाची यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.

चिंचपूर पांगुळ-मानेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराज अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांनी भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
