Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी| आमदार मोनिका राजळे यांच्या आदिनाथ मंडळाला १७ जागा.विरोधी जगदंबा मंडळाला फक्त एक जागा

पाथर्डी| आमदार मोनिका राजळे यांच्या आदिनाथ मंडळाला १७ जागा.विरोधी जगदंबा मंडळाला फक्त एक जागा

mahalokwaniBy mahalokwaniApril 29, 2023Updated:April 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी ।

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा पक्षाच्या (BJP) आ. मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने १७ जागा जिंकत ‘सत्ता परिवर्तन’ घडवले. तर अॅड. प्रताप ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडीला (हमाल मापाडी मतदारसंघ) या अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले.

हे नक्की वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी निवडणुकीत काल सरासरी ९७ टक्के मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणी सुरवात होवून सर्वात आधी सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघाची मतमोजणी झाली. यामध्ये सगळ्याच जागांवर आ.मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने एकहाती विजय मिळवला. यामध्ये वैभव धर्मनाथ खलाटे, जगन्नाथ दादा खेडकर, नानासाहेब यशवंत गाडे, मधुकर शंकर देशमुख, बाळासाहेब मारुती नागरगोजे, सुभाष रभाजी बर्डे, अजय शेषराव रक्ताटे विजयी झाले.

तद्नंतर सहकारी सोसायटी मतदारसंघातील महिला राखीव जागांची मतमोजणी झाली. यामध्ये सुनिता रामनाथ कोलते, स्मिता पांडुरंग लाड या विजयी झाल्या. या पाठोपाठ सहकारी सोसायटी मतदार संघ (इतर मागासवर्गीय)- अरुण गोविंद रायकर, सहकारी सोसायटी मतदार संघ (विमुक्त भटक्या जमाती)- जिजाबा तात्याबा लोंढे हे विजयी झाले.

तर ग्रामपंचायत मतदारसंघाच्या सर्वसाधारण जागेवर शेषराव सुर्यभान कचरे, किरण लक्ष्मण राठोड. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या अनु. जाती जमाती जागेवर रविंद्र बाबुराव आरोळे, ग्रामपंचायत मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जागेवर नारायण भगवान पालवे हे विजयी झाले.

व्यापारी/आडते मतदार संघात कुंडलिक गणपत आव्हाड, प्रशांत प्रकाशलाल मंडलेचा हे सर्व आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार विजयी झाले. तर अॅड. प्रताप ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडीला हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेवर निसटता विजय मिळाला. या जागेवर बाबासाहेब केदार हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले.

आ.मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने सोसायटी मतदार संघातील सर्व जागा जिंकल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.
१८ पैकी १७ जागा जिंकल्यानंतर आ.मोनिका राजळे समर्थकांनी स्व.राजीव राजळे यांच्या प्रतिमेसह जल्लोष साजरा केला. स्वर्गीय राजीव राजळे हयात असतांना एड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात गेलेली बाजार समिती आ.राजळे यांनी पुन्हा एकदा ताब्यात आणली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकाकडे आणि पठाण यांचे मनोमिलन झाल्याने बोधेगावात राजकीय भूकंप होणार.?
Next Article Jamkhed| जामखेड पंचायत समितीत सविधान कार्यशाळा संपन्न
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.