Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी| चिंचपूर पांगुळ येथील ग्रामदैवत (मलकेश्वर)सालशीदबाबा यात्रोत्सवाची कुस्त्याचा हंगामाने सांगता.!

पाथर्डी| चिंचपूर पांगुळ येथील ग्रामदैवत (मलकेश्वर)सालशीदबाबा यात्रोत्सवाची कुस्त्याचा हंगामाने सांगता.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 26, 2023Updated:March 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:

अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी येथील ग्रामदैवत मलिक (मलकेश्वर) महाराजांच्या तसेच सालशीदबाबा यात्रोत्सवाची सांगता आज (दि.२५) रोजी कुस्त्याचा हंगामाच्या कार्यक्रमाने झाली.यात्रा महोत्सवासाठी भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.

श्रीक्षेत्र पैठण व नागतळा येथून पायी कावडधाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने गुरुवारी सायंकाळी मलिक देवास जलाभिषेक घालण्यात आला.
तरुणांनी यावर्षी येथे प्रथमच तमाशा,ऑर्केस्ट्रा,कार्यक्रमास फाटा देऊन हरीकीर्तन ठेवले होते. शुक्रवारी रात्री राष्ट्रीय किर्तनकार हभप. सुनिताताई अभिमंन्यू आंधळे महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन झाले. आज सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम झाला . दुपारी कुस्त्यांचा जगीं हगामा भरवण्यात आला होता.

Advt.

या कुस्त्यासाठी नामवंत मल्लानी हजेरी लावली होती.यावर्षी प्रथमच भव्य दिव्य असे कुस्त्यांचे सामने खेळवले गेले. रात्री उशिरापर्यंत कुस्त्याचा आखाडा रंगला होता. यासाठी हरियाना या राज्यातूनही खेळाडूं उपस्थित झाले होते.

बीड, उस्मानाबाद,पुणे,बारामती,सोलापूर,जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हगाम्यांत हजेरी लावली.कुस्ती समालोचन निवेदक दिनेश गवळी यांनी केले. यावेळी महिला पहिलवान देखील सहभागी झाले होते.यात्रा कमिटीच्या वतीने विजयी मल्लांना भरघोस इनामाने गौरविण्यात आले. महाराष्ट्र केसरी विजेते सईद चाऊस ,पाथर्डी पचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड,बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ शिरसाट,हभप आंधळे महाराज,अनिल गुंजाळ,बाळू आवारे,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आकाश मलिक,नितीन मलिक,सुमित कुमार,या हरियाणाच्या मल्लानी उपस्तिती लावली.बापूसाहेब बडे,शहादेव खाडे, गोविद बडे,बाळासाहेब बडे,सईद चाऊस यांनी पंच म्हणून काम पाहिले.
संपूर्ण पाथर्डी तालुक्यातून, परिसरातील,मुबंई, पुणे,छत्रपती संभाजी नगर,तसेच इतर ठिकाणी असलेले चाकरमानीही आवर्जून यात्रेसाठी उपस्थित होते.चिचपुर पांगुळ येथे दरवर्षी चैत्र महिन्यात गुडीपाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवार ते शनिवार या दरम्यान यात्रा भरते. यावर्षी तरुणांनी ठरवले तर काहीही अशक्य नाही .याचाच प्रत्यय या यात्रे निमित्त आला.गावातील तरुणांनी यात्रेचे उत्तम प्रकारे नियोजन करत यात्रा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात,शांततेत पार पाडला.
यावेळी कुस्ती शौकीन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया-सोमराज बडे)

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखानवटे तालुका दौंड येथे रेल्वे रुळावर सापडला अनोळखी तरूणाचा मृतदेह; हत्या की आत्महत्या.?
Next Article कर्जत-जामखेड मतदारसंघातील 10 हजार गरजू विद्यार्थ्यांना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सायकलचे वाटप
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.