Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी भगवानगड व ४६ गाव पाणीपुरवठायोजना काम बंद करण्याची वेळ ?

पाथर्डी भगवानगड व ४६ गाव पाणीपुरवठायोजना काम बंद करण्याची वेळ ?

mahalokwaniBy mahalokwaniMay 8, 2023Updated:May 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऊस तोडणी कामगाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवानगड आणि ४६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार आणि अनियमितता असून सदरील योजनेच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिकरित्या न करत पाथर्डी तालुक्यातील लोकप्रतिनिधीतल्या विशेष कार्यकर्त्यांना काम देऊन कामामध्ये भ्रष्टाचार चालला आहे .

याची लेखी तक्रार जीवन प्राधिकरण विभागाला देऊ नाही संबंधित योजनेच्या कामाची कुठली तपासणी न करता जीवन प्राधिकरण विभागाकडून ठेकेदाराचे समर्थन केले जात असल्याने भगवानगड ४६ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम बंद करणार असल्याची माहिती लोकपत्रकार दादासाहेब खेडकर यांनी दिली आहे याबाबत जीवन प्राधिकरण विभागात देखील निवेदन देऊन संबंधित ठेकेदाराचे कुठलेही बिल अदा न करण्यात यावे अशीही तक्रार करण्यात आली आहे भगवानगड ४६ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतलेल्या विजय मुंडे कंट्रक्शन आणि प्रभाकर सरकाटे या संबंधित ठेका एजन्सीने काम पाथर्डी तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या हितसंबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना देऊन भगवानगड पाणीपुरवठा योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे आणि या कामावर ज्यांचे नियंत्रण आहे त्या जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी शाम वारे इंजिनीयर मृणाल धगधगे यांनी ठेकेदारांच्या चुकावर पांघरून घालवण्याचे काम चालवले आहे यावर भगवानगड परिसर प्रेस क्लबचे अध्यक्ष दादासाहेब खेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अप्पर सचिव अभिषेक कृष्णा नाशिक विभाग प्रमुख भुजबळ अहमदनगर जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता शाम वारे यांच्याकडे तक्रार केली आहे आणि भगवानगड ४६ गाव पाणीपुरवठा योजनेत चाललेल्या चुकीच्या कामाची व भ्रष्टाचाराची लेखी तक्रार देऊन संबंधित ठेका एजन्सीची देयके त्वरित थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे व्ही यु बी कन्ट्रक्शन या ठेका एजन्सीचे देयके देऊ नये अशी मागणी कार्यकारी अभियंता शाम वारे यांना केली असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेका एजन्सीचे समर्थन केल्याने भगवानगड पाणीपुरवठा योजनेत कोट्यावधी रुपयांचा काळाबाजार आणि देवाण-घेवाण झाल्याचा संशय बळावला आहे.

भगवानगड ४६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी १९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून भगवानगड पायथ्याशी असणाऱ्या प्रत्येक गावात व्ही यु बी कंट्रक्शन या ठेका एजन्सी कडून न होता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांमार्फत केले जात आहे योजनेचे अंदाजपत्रक सार्वजनिक केले जात नाही भगवानगड ४६ गाव पाणीपुरवठा योजना या जलवाहिनीचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने चालले असून यावर जीवन प्राधिकरण विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे भगवानगड ४६ गाव पाणीपुरवठा योजनेचे काम आता बंद करण्याची वेळ आली आहे याबाबत कायदेशीर कारवाई न झाल्यास जीवन प्राधिकरण विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाची बनवाबनवी; शिक्षक मान्यता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल ?- राम खाडे
Next Article दिल्ली येथील जंतर मंतर आंदोलकांना जामखेड येथे पाठिंबा; प्रा.मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना निवेदन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.