Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पाथर्डी येथील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर हल्ला करणारे तीन आरोपी गजाआड

पाथर्डी येथील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर हल्ला करणारे तीन आरोपी गजाआड

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांची दमदार कामगिरी

महालोकवाणी न्यूज

सोमराज बडे: पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी येथील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांना दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी गंभीर जखमी करून लुटल्या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी जलदगतीने तपास करत आरोपी विशाल शिवाजी एडके रा.पाथर्डी, दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे या तीन आरोपीना गजाआड केले आहे.

बंडूशेठ चिंतामणी हे गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान नेहमी प्रमाणे त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी निघाले असता त्यांचा शेवगाव रोड लगत अर्जुना लॉन्स जवळ असलेल्या ओढ्या जवळ अज्ञात चोरट्यांनी दुचाकी गाडी अडवून त्यांच्या कडील पिशवी हिसकावली असता चिंतामणी यांनी त्यास विरोध केला.त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्रांनी चिंतामणी यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले होते. या घटनेने शहरासह तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले होते.
त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करत शुक्रवारी शहरातून पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शंका उपस्थित करण्यात आली होती.

या घटनेचा तपासकामी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आपल्या सहकाऱ्यांसह तालुक्यातील संशयीतावर नजर ठेवली होती.


गोपनीय खबऱ्या मार्फत शहरातील आरोपी विशाल शिवाजी एडके याची गुन्हा घडल्याल्याच्या वेळेदरम्यान संशयित हालचाली बाबत माहिती मिळाली होती.त्यानुसार एडके याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली., मात्र एडके हा सुरवातीस उडवा उडवीचे उत्तरे देत होता.परंतु पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी विशाल एडके याने आरोपी दीपक दत्तात्रय राख रा.केडगाव, दीपक तोताराम सोमनकर रा.राघू हिवरे यांच्या मदतीने आपण सराफ चिंतामणी यांच्यावर आठ दिवसापासून पाळत ठेवून संगनमताने चिंतामणी यांना लुटून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.


पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,रामेश्वर कायंदे,पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे,पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप,निलेश म्हस्के,संदीप गर्जे,देविदास तांदळे,गरकळ,अतुल शेळके,राहुल निमसे,राहुल तिकोने,संदीप कानडे,,ईश्वर बेरड,लक्ष्मण पवार,ज्ञानेश्वर रसाळ,संदीप बडे, आदीनी सर्व आरोपींना शिताफीने पकडले असून या घटनेचा पुढील अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकुंभारगावच्या महिला सरपंचावर होणारा अन्याय थांबता थांबेना
Next Article योगेश पिंपळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.