प्रताप ढाकणे यांनी दिली सर्वपक्षीय बंद व मोर्चा ची हाक
महालोकवाणी न्यूज: दिनांक 23 फेब्रुवारी 2023
सोमराज बडे: पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील नवी पेठेतील सोन्या चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून अर्जुना लॉन्स च्या पाठीमागे असलेल्या राहत्या घरी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला करून सोन्याची दागिने असलेली बॅग पळवविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.चिंतामणी यांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे.दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बंडू शेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी हे मोटरसायकलवर दुकान बंद करून घरी जात असताना शेवंगाव रस्त्यावर ओढ्या नजीक चोरट्याने पिशवी हिसकावली त्यास विरोध केला असता चोरट्याने त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान,बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नगर येथे अभय आव्हाड यांच्या गाडीने नगरला तात्काळ हलविण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत झालेल्या घटनेवर चिंता व्यक्त करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.यावेळी सराफ संघटनेचे राजेंद्र शेवाळे,बाळासाहेब जिरेसाळ,सुनील भांगे,संजय दराडे,सुनील मानूरकर,मोदक शहाणे,मधुकर मानूरकर,बाळासाहेब जोजारे तसेच माजी नगरसेवक बंडू बोरुडे,चांद मणियार,मुकुंद गर्जे,अमोल गर्जे,नासीर शेख,किशोर परदेशी,धरमचंद गुगळे,चांदमल देसरडा यांच्यासह शेकडो नागरिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल होते.