Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पारनेर आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; तीन वर्षांपासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरळीत चालू.!

पारनेर आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; तीन वर्षांपासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरळीत चालू.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


सन 2020 पासून पुढील या जैविक महामारीच्या माध्यमातून शासनाने केलेले लॉकडाऊन व तेव्हापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे आलेली मरगळ व त्यामुळे तोट्यात चाललेले परिवाहन महामंडळ यांनी आपल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक गावांमधील मुक्कामी बसेस बंद केल्या होत्या.

दैनंदिन कामकाजासाठी तसेच उच्च माध्यमिक माध्यमिक व इंग्रजी माध्यमातील पारनेर शहरात असणाऱ्या शाळा व त्या शाळेत शिकणारी विद्यार्थी तसेच पारनेर शहरात असणारे तालुक्यातील तहसील पंचायत समिती कोर्ट -कचेरी यासारखे मध्यवर्ती शासकीय कार्यालयात खेड्यापाड्यातून पारनेरशी दैनंदिन नाळ जोडलेले सर्वाधिक प्रवाशांना तसेच उद्योगधंद्यासाठी आपला व्यवसाय बंद करून आपल्या स्वगृही जाण्यासाठी जाणाऱ्या उद्योजकांना व रात्रीच्या वेळी इतर जिल्ह्यातून येणारे ग्रामस्थ यांना या मुक्कामी गाड्या बंद झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते .


पारनेर सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या अकरा गावातील पदाधिकारी नेतेमंडळी व ग्रामस्थांनी अनेक वेळा पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क केला होता . व आमदार लंके यांनीही वारंवार पारनेर आगाराचे व्यवस्थापक श्री.कोतकर यांच्याशी संपर्क करून सदर अकरा गावांमध्ये मुक्कामी बस सेवा पूर्ववत करण्याची तोंडी व लेखी स्वरूपात मागणी केली होती.

आगार व्यवस्थापक श्री. अमोल कोतकर यांनी सदर गावाच्या मुक्कामी बसेस आपण चालू शैक्षणिक वर्षांपासून दिनांक १५ जून पासून पुन्हा सुरू करत आहोत तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी आपल्या सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी पासेस त्वरित काढून घेण्याचे आवाहन केले आहे.


पारनेर आगाराचे दोन वाहतूक नियंत्रक सर्व शाळा/महाविद्यालये या ठिकाणी जावून विद्यार्थ्यांना पासेस चे वाटप करणार आहेत,त्यामूळे विद्यार्थ्यांना तासनतास बस स्थानकावर पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही तसेच महामंडळातर्फे ७५ वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास योजनेचा व महिला प्रवासी यांना प्रवासात ५०% सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.कोतकर यांनी केले आहे.

खालील ठिकाणचे एस टी बसचे मुक्काम 3 वर्षानंतर पुन्हा चालू होत आहे.
गाव मुक्कामी एस टी बस गावे पुढीलप्रमाणे
१)वारणवाडी २)कोतुळ
३)जवळा ४)वासुंदे
५)सुरेगाव ६)गुणोरे
७)पिंपरी जलसेन ८)डोंगरवाडी
९)तिखोल १०)कळस
११)वनकुटे


या बस दिनांक 15 जून पासून पूर्ववत होणार असल्यामुळे सदर गावातील व परिसरातील प्रवासी उद्योजक व व्यावसायिक मित्रांनी आमदार निलेश लंके व आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांचे आभार मानले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आजी- माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन..!
Next Article boAt Smartwatch: 1699 रुपयांना लॉन्च झाले नवीन घड्याळ, आता स्वस्तात घेता येईल महागड्या फीचर्सचा आनंद.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.