Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पोलिस भरतीत गोळाफेकीच्या ३ संधी! अशी असणार गुणांची बेरीज

पोलिस भरतीत गोळाफेकीच्या ३ संधी! अशी असणार गुणांची बेरीज

mahalokwaniBy mahalokwaniDecember 21, 2022No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.

अशी असणार गुणदान पद्धत

गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :

८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.

गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) :

६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत

१०० मीटर धावणे (पुरुष) :

११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.

१०० मीटर धावणे (महिला)

१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.

८०० मीटर धाव (महिला)
२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.
१६०० मीटर धावणे (पुरुष) :
५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.

लेखीसाठी ‘ओएमआर’ प्रश्नपत्रिका

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल. चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदौंड शहरातील जुन्या पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था
Next Article आपल्या आरोग्यासाठी खास काही घरगुती टिप्स
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.