चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे , व उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते या, यावेळी अहमदनगर शहराचे नाव बदलून आहिल्यानगर ठेवण्याची घोषणा करण्यात आली, या कार्यक्रमावेळी
जामखेड शिवसेना तालुका प्रमुख मा . प्रा . कैलास माने यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला .

यावेळी सत्कार प्प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे यांनी प्रा . कैलास माने यांच्या कामाचे तोंडंभरुन कौतुक केले, जेव्हा पासून माने यांच्यावर जामखेड तालुक्याची जबाबदारी दिली आहे , तेव्हा पासून त्यांनी अनेक युवा कार्यकर्ते तयार केले आहेत, तसेच जामखेड तालुक्यात शिवसेनेची मोर्चे बांधणी अतिशय उत्तम रित्या पार पाडली आहे ,
प्रा. कैलास माने यांचे काम जरी जामखेड तालुक्यात असले तरी, त्यांच्या कामांची चर्चा मात्र मुबई पर्यंत असते, कारण माने सरानी सामाजिक , राजकीय व आरोग्य सेवेत अमूल्य असे योगदान देत आहेत, गोरगरीब लोकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना माने हे उत्तम प्रकारे पोचवितात, तसेच रक्तदान शिबीर , विविध सामाजिक कार्यसाठी प्रा , कैलास माने हे नेहमी तत्पर असतात .
येणाऱ्या काळात जामखेडची नगरपालिका हि शिवसेनेला आपल्या ताब्यात घेयची आहे , या दृष्टीने जामखेड शिवसेनातालुका प्रमुख प्रा , कैलास माने सर यांनी युवकांची मोर्चे बांधणी चालू आहे , येणाऱ्या काळात लवकरच जामखेड मध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात येणार आहे अशी ,माहिती यावेळी जामखेड शिवसेनातालुका प्रमुख प्रा , कैलास माने यांनी सांगितले .
यासत्कार प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस , विधान परिषद आमदार प्रा. राम शिंदे , खासदार सदाशिव लोखंडे, सचिन जाधव , अनिल शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते
