दौंड: फिनोलेक्स पाईप्स कंपनी ही पीव्हीसी पाईप्स मध्ये भारतात अग्रगण्य असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकत्याच झालेला राष्ट्रीय किसान दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यानंतरचा हा पहिला राष्ट्रीय किसान दिन फिनोलेक्स कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा केला आहे. यावेळी कंपनीच्या विक्री अधिकारी वर्गामार्फत शेतकऱ्यांना फिनोलेक्स च्या नवनवीन उत्पादनांबद्दल माहिती देण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात फिनोलेक्स शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे असेल असा विश्वास निर्माण केला.
फक्त व्यवसाय हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता गेली 40 वर्षे फिनोलेक्स कंपनी विविध मार्गांनी शेतकऱ्यांची मदत करत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी पुणे व रत्नागिरी येथे फिनोलेक्सने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी फिनोलेक्स कडून आर्थिक सहाय्य केले जाते. एवढंच नाही तर आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिनोलेक्स कंपनी मेडिकल कॅम्प व विविध स्टॉल्सचे आयोजन करते.

फिनॉलेक्स पाईप्सने आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी बांधवांशी आपले नाते जोडून ठेवण्यासाठी या कंपनीकडून विविध उपक्रम देखील राबविले जातात. या कंपनीच्या उत्पादनांची गुणवत्ता व दर्जेदार सेवा यामुळेच 40 वर्षे होऊन देखील फिनॉलेक्स आजही लोकांच्या मनात घर करून आहे. राष्ट्रीय किसान दिनाच्या ( National Farmers Day) निमित्ताने हे नाते आणखी घट्ट करण्यासाठी फिनोलेक्स कंपनीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी फिनोलेक्स कंपनीचे विक्री अधिकारी श्री कल्याण गोफणे (बारामती) तसेच परिसरातील शेतकरी श्री अनिल गुणवरे, श्री संतोष खरबुजे, श्री सचिन गुणवरे , श्री सिद्धार्थ शिंदे, श्री संभाजी कुऱ्हाडे,श्री दिगंबर मुरूमकर उपस्थित होते
