Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बारा बलुतेदार महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार पदाचा उपयोग समाज हितासाठी करावा – आ.संग्राम जगताप

बारा बलुतेदार महासंघाच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार पदाचा उपयोग समाज हितासाठी करावा – आ.संग्राम जगताप

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 1, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – सामाजिक क्षेत्रात काम करतांना समाजसेवेचे व्रत म्हणून काम केले पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटतात. बारा बलुतेदार महासंघाने जिल्ह्यातील समाजासाठी भरीव काम केले. या संघात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नूतन पदाधिकार्‍यांनी पदाचा उपयोग हा समाजहितासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

अमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट आढळला !


सावेडी उपनगरात बारा बलुतेदार महासंघाच्या संपर्क कार्यालयात नवीन वर्षानिमित्त काही नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. या सर्वांचा सत्कार आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्यक्ष शाम औटी, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, जालिंदर बोरुडे, अ‍ॅड.मनोज जायभाये, श्रीकांत मांढरे, मच्छिंद्र बनकर, लवेश गोंधळे, सचिन वारे, कुलदिप भिंगारदिवे, संदिप घुले, सागर नांदुरकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले, नवीन निवड झालेले पदाधिकारी हे समाजातील प्रतिष्ठीत व समाजातील प्रश्नांची जाण असलेले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे मिळालेल्या पदाच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करतील. त्याचबरोबर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठबळ मिळणार असल्याचे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

वरुण सरदेसाई यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश


प्रास्तविकात जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड म्हणाले, बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून सर्व समाजाची उन्नत्तीसाठी सर्व एकसंघ काम करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्नही मार्गी लागले आहेत. नूतन पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल इवळे यांनी केले तर अ‍ॅड.मनोज जायभाये यांनी आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNew Year 2023: नव वर्ष शेतकऱ्यांचे; मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा !
Next Article सोलापुरात मोठी दुर्घटना, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, बार्शी तालुक्यात खळबळ
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.