महालोकवाणी न्यूज:
नगर – कोणत्याही क्षेत्रात काम करतांना कार्यकर्त्यांची ताकद पाठीशी पाहिजे. नगर जिल्ह्यात बारा बलुतेदार महासंघ स्थापन झाल्यापासून यामध्ये कार्यकर्ते एकानिष्ठ राहुन काम करतात त्यामुळे विविध प्रश्न सुटत आहे. हेच कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्याने माझी जिल्हा संघटक पदी झालेली निवड संघटनवाढी विषयी मला पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर कविटकर यांनी केले.
हे नक्की वाचा Solapur :कोण रोहित पवार? म्हणतं.. आमदार प्रणिती शिंदेंनी काढली रोहित पवारांची मॅच्युरिटी !
नगर शहरातील आगरकर मळा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कविटकर यांची ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अनिल इवळे, सचिव शाम औटी, सहसचिव श्रीकांत मांढरे, महिला शहराध्यक्ष रोहिणी बनकर, मच्छिंद्र बनकर, भाऊसाहेब कोल्हे, बाळासाहेब इवळे, राजू ढवण, जालिंदर बोरुडे, मल्हारी गीते, सागर नांदुरकर, संदिप घुले, आदिनाथ गायकवाड, अजय अकलुजकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.कविटकर पुढे म्हणाले, बारा बलुतेदार महासंघात सर्व समाजातील कार्यकर्ते कार्यरत आहे. प्रत्येक समाजातील प्रश्न अडचणी सोडविण्याची जबाबदारी सर्वांची आहे हे लक्षात घेऊन सर्वजण काम करतात. मला दिलेली जबाबदारी मी यशस्वी पार पाडीन. त्यासाठी कार्यकर्ते मला पाठबळ देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात आपल्या ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या शाखा आहेत. कार्यकर्ते हीच आपली ताकद आहे. प्रत्येकाने आपल्या कामातून आपली चांगली ओळख निर्माण करुन संघटना वाढवावी, असे मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
शेवटी अनिल इवळे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महासंघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
