Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मतदार संघात मोफत वीज , मोफत पाणी देणार -खा. डॉ.सुजय विखे पाटील

मतदार संघात मोफत वीज , मोफत पाणी देणार -खा. डॉ.सुजय विखे पाटील

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 5, 2023No Comments4 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी ( प्रतिनिधी)

महालोकवाणी न्यूज:- दिनांक 5 फेब्रुवारी 2023

राज्यात सत्तातंर झाले आणि आपले सरकार आले, अवघ्या तीन महिन्यांत रखडलेल्या सर्व प्रकल्पांना निधी देऊन पूर्ण करणार आहोत.असा विश्वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त करून आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यास मोफत वीज आणि पाणी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पाथर्डी येथे मीरी तिसगांव सह ४३गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले होते आणि भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, राहुल राजळे, भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागील अडीच वर्ष म.वि.आ.सरकार च्या काळात जिल्ह्यात एक फुटकी कवडीचा निधी आला नाही आणि विरोधक हे भूमिपूजन समारंभ करण्याचे ठरवत आहे, यांना नैतिक आधिकार आहे का ? असा सवाल उपस्थित करून या भागात रस्त्याची जी कामं झाली त्याचे श्रेय फक्त भाजपचे आहे असे खासदार विखे यांनी ठणकावून सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९च्या निवडणुकीत माता भगिनीस आश्वासन दिले होते की हर घर नल, त्यानुसारच जल जिवन मिशन अभियान राबवून आज गावोगावी ह्या योजनेचे काम सुरू आहे. मिरी तिसगांव व इतर ४३ गावे प्रादेशिक योजनेंतर्गत आपल्या मायमाऊलीस याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी १५४.४७ कोटी रूपये मंजूर केले असून,लवकरच ही योजना कार्यान्वित होईल आणि आपल्या माता भगिनिंची पाण्याची ओढाताण थांबेल. एवढेच नाहीतर या योजनेसाठी लागणारे वीज बील देखील पूर्ण माफ होणार आहे. या शिवाय या भागातील विविध पाणीपुरवठा योजनेचे वीज बील देखील माफ करणार आहोत. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांना मोफत पाणी आणि वीज देणार असल्याचे यावेळी खा. डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.

हे ही वाचा:- अखेर सत्यजीत तांबेंनी राजकीय भूमिका मांडली, फडणवीस, थोरात, पटोले…सगळंच बाहेर काढलं !


आज आपण जिवंत आहोत ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच, कोरोना काळात मोदींनी सर्वांसाठीच मोफत लसीकरण कार्यक्रम हाती घेतला, त्याचा परिणाम आपण या महामारीतून सहीसलामत बाहेर आलो असे सांगून मोदींच्या या दूरदृष्टीमुळे आपला देश या संकटकातून बाहेर आला, याच महामारीने अनेक देशांची वाताहत झालेली आपण पाहिली आहे. मोदींचे नेतृत्व हे सर्वसमावेशक असेच असून देशाचा सर्वांगीण विकास साधणारे आहे. आता तर जगाने ही मा.पंतप्रधान नरेंद्रमोदींचे नेतृत्व मान्य केल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा त्यांनाच आपला मतदानरूपी पाठिंबा द्यायचा आहे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


गेल्या तीन महिन्यांत आपण राज्याच्या कारभार देखील पाहत आहात, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार देखील तितक्याच सक्षमपणे काम करत आहे.” हे सरकार या दिवशी पडणार, त्या दिवशी पडणार.”आमदार नाराज अशा वावड्या काही बिनकामाचे लोक उठवत आहेत.मात्र आपणास आवर्जून सांगतो हे सरकार संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार, आपल्या सर्वांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार आहे. एवढेच नाही.तर तर आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात” न भूतो न भविष्यती”असे काम करून दाखवणार आहे.असे वचन या प्रसंगी खासदार विखेंनी उपस्थितांना दिले. कोल्हारघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि खडीकरण केल्याशिवाय आपण या भागात येणार नाही असा निर्धार ही यावेळी त्यांनी केला.

यावेळी माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी सांगितले की राज्यात युती शासन असताना,या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मान्यता मिळाली होती.मात्र ज्यांना या योजने विषयी काहीच माहिती नाही ते भूमिपूजन समारंभ घेत आहेत असा विरोधकांना टोला लगावला. मागील अडीच वर्षांत या योजनेसाठी एक रूपायाचा सुद्धा अनुदान मिळाले नाही असे सांगितले. एवढेच नाहीतर या मतदारसंघात कुठल्याही विकासकामा करिता साधा प्रस्ताव देखील दिला नव्हता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघासाठी अनेक योजना मंजूर केल्या असून पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वात आगामी काळात अनेक योजना सुरू करनार असल्याचे या प्रसंगी बोलतांना सांगितले.

याप्रसंगी भाजपा अध्यक्ष अरूण मुंडे ,पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष आटकरे आदींची यावेळी भाषणे झाली.

हे ही वाचा:–

अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अदानीला कोणत्या बँकांनी किती कर्ज दिले !

यावेळी मीरी तिसगांव व ४३ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन खा. डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाले. तसेच चिंचोडी गावासाठी कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने नऊ विविध योजनेचा समावेश असलेले मोफत कार्डचे वितरण गावातील महिलांना करण्यात आले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह पदाधिकारी,विविध विभागाचे आधिकारी यांची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअखेर सत्यजीत तांबेंनी राजकीय भूमिका मांडली, फडणवीस, थोरात, पटोले…सगळंच बाहेर काढलं !
Next Article कर्जत-जामखेडसाठी पाच कोटींचा निधी; आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.