९ वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
शिवाजीराव सातव यांच्या महाराष्ट्र विकास केंद्र गेल्या ९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असून संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.अशा या संस्थेच्या माध्यमातून सातव यांचे कार्य कौतुकास्पद आहे,असे मत गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब ठाकरे धनवे यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य संचलित, महाराष्ट्र प्रशिक्षण विकास केंद्र डोणगाव यांच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कार्य बद्दल पुरस्कार तसेच होमगार्ड सैनिक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

पुढे बोलताना गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की, संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सातव यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करतात हे मोठे समाज कार्य आहे.असे उदगार गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती म्हणाले की, ग्रामीण भागातील अत्यंत मागास भागात संस्थेच्या माध्यमातून शिवाजी सातव यांनी शिक्षण घेऊन परंतू रोजगार पासून वंचित आहेत ,अशा तरुणांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली,परंतू या सोहळ्याला तरुणच उपस्थित नाही अशी खंत व्यक्त केली, शिवाजी सातव यांच्या सारख्या धडाडीच्या कार्यपुरूषाला गावातील तरुणांनी साथ दिली पाहिजे.

याप्रसंगी डोणगाव चे पोलीस पाटील बिभिषण यादव यांना समाज भूषण व अरणगावचे प्राचार्य तांबोळी सर यांना आदर्श शिक्षक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल युवा पत्रकार धनराज पवार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी ह. भ. प. मधुकर महाराज यांना सन्मानित करण्यात आले. गृहरक्षक दल (होमगार्ड) मध्ये सेवा देणाऱ्या होमगार्ड सैनिकांना गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब धनवे व पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती व तालुका समादेशक होमगार्ड चे डाॅ सुरेश काशिद यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती होते.
यावेळी डॉ. सुरेश काशिद (तालुका समादेशक ), ह. भ. प. मधुकर यादव, परशूराम राऊत विस्तार अधिकारी ( पुणे), सरपंच नितीन वारे, उपसरपंच अजित यादव, संकल्प बहुउद्देशिय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सातव, संदीप भुजबळ दिव्यांग से. अध्यक्ष जामखेड,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट जमदाडे, चेअरमन गणेश डोंगरे, रामदास गंभीरे सर, भिमराव पाटील,कोकाटे सर, माजी सरपंच सुभाष धनवे,
माजी सरपंच बाळासाहेब यादव, माजी सरपंच अर्जुन यादव , अंकुश राऊत,ग्रामपंचायत सदस्य अमोल यादव, आण्णा यादव, आबा पोठरे, राजेंद्र धनवे सर, प्रशांत साळवन,बाबासाहेब धनवे, श्रीपती पवळ, कांतीलाल धनवे, बारकू धनवे, संभाजी गायकवाड, शामराव मोरे, प्रभाकर गायकवाड,मनोज मोरे, अंकुश पवळ, गणेश यादव, युवा नेते महेश यादव , पत्रकार पोपट मोरे आदी मान्यवर,ग्रामस्थ व होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील बिभीषण यादव यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष शिवाजी सातव यांनी मानले.
