Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महालोकवाणी न्यूजचा इम्पॅक्ट; महिला अत्याचार प्रकरणी जामखेडकर पेटले, हे राजकीय पक्ष थेट उतरले रस्त्यावर..!

महालोकवाणी न्यूजचा इम्पॅक्ट; महिला अत्याचार प्रकरणी जामखेडकर पेटले, हे राजकीय पक्ष थेट उतरले रस्त्यावर..!

mahalokwaniBy mahalokwaniMay 23, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड रत्नदीप मेडीकल फौंडेशन ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर चा अध्यक्ष भास्कर मोरे याने शिक्षणासाठी आलेल्या अनेक मुलिंचे वेगवेगळ्या माध्यमातून शोषण केले आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषणातू या काॅलेज मध्ये शिकणाऱ्या दोन मुलिंनी आत्महत्या केल्या आहेत तर अनेक मुला मुलींनी याच्या जाचाला कंटाळून शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे.

या नराधमाच्या कुकर्माचा अतिरेक होतं असताना ग्रामीण भागातील मुली बदनामीच्या भीतीने व शिक्षणात अडथळा निर्माण करून आपल्याला जाणीव पूर्वक नापास करीलं या भीतीनं समोर येऊन बोलायला अथवा पोलिसांत जाऊन तक्रार करायला घाबरत असताना बी फार्म मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने ४ मे २०२३ रोजी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करण्याचं धाडस केलं आहे .

मात्र या मुलीच्या तक्रारीचा गैरफायदा घेऊन पोलीस यंत्रणा व काही पत्रकारांनी आपले खिसे भरून घेतले व या गंभीर प्रकरणाची एक बातमी नाही अथवा पोलिसां कडून कोणतीही कडक कारवाई झाली नाही. ४ मे रोजी गुन्हा नोंद होऊन देखील आरोपी भास्कर मोरे ७ मे रोजी च्या नीट परीक्षेच्या वेळी उजळ माथ्याने खुलेआम फिरतं होता आणि पोलिस यंत्रणा डोळे बंद करून बसली होती याचं कारण काय ? हे मेलेल्या मडयावरचं लोणी खाणं नाही काय ?

कुकर्मा नराधम भास्कर मोरे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून सर्व आमदार मा. रोहित पवार, आमदार मा. राम शिंदे,खासदार मा. सुजय विखे व लोकप्रतिनिधी मुगगिळून बसले आहेत काय असा प्रश्न निर्माण होतं आहे. एका मुलीवर अत्याचार होतो, ती पोलीसांत जाऊन तक्रार दाखल करण्याचं धाडस करते व तिला कोणीही न्याय देतं नाही तरी देखील महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शांत कशा राहू शकतात ? महीलांप्रती संवेदनशील आहे असा डांगोरा पिटणाऱ्या चित्रा वाघ मुगगिळून का बसल्या आहेत? वेगवेगळ्या विषयांवर कायम गळा काढणारे आमदार गोपिचंद पडळकरांना जामखेड फक्त३१ मे राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्तचं लक्षात येतं काय ? इथल्या अहिल्येच्या लेकीवर अत्याचार होतो व आरोपी भास्कर मोरे मोकाट फिरतो हे मा. पडळकरांना दिसतं नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पोलिस यंत्रणा, प्रशासन, प्रसार माध्यमे यांच्या सामाजिक जाणीवा बोथट व भ्रष्ट झाल्या आहेत म्हणून संभाजी ब्रिगेडने व राष्ट्रीय समाज पक्षाने मुलींच्या संरक्षणार्थ व सन्मानार्थ मैदानात उतरू आज जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले आहे. भास्कर मोरे या नराधमाने लैंगिक शोषणा बरोबर आर्थिक शोषणं देखील केले आहे. किरकोळ कारणावरून मुला मुलींनी वेळोवेळी आर्थिक भुर्दंड सहन केला आहे. मनमानी पद्धतीने फिसच्या नावाखाली पैसे उकळतं आहे. आपणास हा माणूस नापास करीलं या भीतीनं समोर येऊन बोलायला तयार नाहीत.
या महाविद्यालयात सर्व कोर्स साठी आवश्यक सोईसुविधा नाहीत, लॅब,प्रयोगशाळा,शिक्षक संसाधने उपलब्ध नसताना याला मान्यता कशी मिळाली हा गंभीर विषय आहे .एकचं इमारत दाखवून दोन विद्यापिठांच्या मान्यता मिळाल्या कशा ? याने शैक्षणिक क्षेत्राची फसवणूक केली आहे काय ? या संदर्भात संबंधित विभागाकडे चौकशीची मागणी करून हा शोषणाचा कारखाना कायम स्वरुपी बंद करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आजं पासून सुरूवात करतं आहे.

आजचा रास्ता रोको हा संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय समाज पक्ष, व इतर सर्व संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केला होता या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ यांनी केले, या वेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राजेंद्र काटकर, सचिव वाल्मिक रेडे, जामखेड मधील जेष्ठ नेते डॉ अविनाश पवार , चिलगर मेजर, ओंकार श्रीरामे , मोहन मामा गडदे, गणोश सुळ, मोहन देवकाते, नंदू खरात , तुषार बोथरा, सुरज पवार, उमेश मुळे, सचिन काशीद, नागेश लोंढे , आनंद खरात, सर्जेराव पाटील, बदामराव गायकवाड उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePiles मूळव्याध नक्की कशामुळे होते; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार पद्धती .!
Next Article जामखेड लैंगिक अत्याचार प्रकरणी वंचित बहुजन आघाडी या दिवशी करणार उपोषण.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.