Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महालोकवाणी न्यूज Effect| तपनेश्वर रोड डिपीचा गंभीर प्रश्न आमदार प्रा. राम शिंदे यांच्या एका फोनवर लागला मार्गी.!

महालोकवाणी न्यूज Effect| तपनेश्वर रोड डिपीचा गंभीर प्रश्न आमदार प्रा. राम शिंदे यांच्या एका फोनवर लागला मार्गी.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

तपनेश्वर रोड येथील नागरिकांनी मानले आमदार प्रा. राम शिंदे यांचे आभार…

जामखेड: जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील आहुजा निवास समोरील अगदी मुख्य रस्त्यावरील उघडी डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहे. वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असताना तेथील राहिवासी यांनी महालोकवाणी न्यूज चे जामखेड प्रतिनिधी धनराज पवार यांना फोन करून बातमीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यास सांगितले.


याबाबत माहिती अशी की, नागरिकांनी कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांना फोन करून माहिती दिली तसेच नागरिकांनी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवावा.असे सांगितले होते. त्वरित दखल घेत आमदार प्रा राम शिंदेनी महावितरण कंपनीचे उप अभियंता योगेश कासलीवाल यांना संपर्क करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे डिपी चे काम झाले. अवघ्या ८ दिवसांत हा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याबद्दल आमदार प्रा राम शिंदे यांचे नागरिकांनी आभार मानले.


यावेळी बोलताना अमित चिंतामणी म्हणाले की, या ठिकाणी होणाऱ्या त्रासाला लोक कंटाळले होते,
लहान मुले रस्त्याच्या कडेला खेळत असतात. तसेच बाहेर कामा निमित्त फिरण्यासाठी जाणाऱ्यांना याच डीपीपासून जावे लागत होते. एखादवेळी दुर्लक्ष झाल्यास मुले डीपीकडे जाण्याचा धोका असतो. पादचाऱ्यांनाही अगदी डीपीजवळून जावे लागते.कधीही धोका संभवू शकतो. वस्तीतील मंडळींना बाहेर पडण्यासाठी हाच मार्ग आहे. वरच्या भागात ट्रान्सफार्मर आणि यावरून मुख्य वीजवाहिनी आहे. मुख्य डीपी पुरती मोडकळीस आली होती. पूर्वी ही यंत्रणा रस्त्याच्या कडेला होती. आता सिमेंट रस्ता तयार झाल्याने डीपी अगदी रस्त्यावर आली आहे. सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नव्हती, जनावरांचा नेहमीच वावर होता. अखेर या प्रश्नाचे बातमी सर्वत्र सोशल मीडियावर पडताच संपर्क केला होता. व याची कल्पना आमदार प्रा. राम शिंदे यांना दिली होती


या डिपी चे काम वायरमन संतोष अष्टेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम केल्याबद्दल व युवा पत्रकार धनराज पवार यांनी बातमीच्या माध्यमातून हा गंभीर प्रश्नसोडविल्याबद्दल नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, प्रा.संजय राऊत सर, डॉ अशोक बांगर, युवा नेते राम पवार, भाजपा शहर उपाध्यक्ष बाबासाहेब फुलमाळी, शिवकुमार डोंगरे, सचिन देशमुख,प्रशांत चव्हाण, प्रकाश सांगळे, गणेश मासाळ, विशाल जाधव, विजय क्षिरसागर, गोकुळ क्षिरसागर, नंदकुमार खराडे,खंडू भोसले आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा.संजय राऊत सर यांनी या डिपी संदर्भात फोन वरून आमदार प्रा राम शिंदे यांना संपर्क केला होता. असे अनेक शहरातील प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास युवा पत्रकार धनराज पवार यांनी आणून दिले.

सरपंच गफ्फार पठाण यांनी घडविले हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन; वारकऱ्यांसाठी मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा.!

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहालोकवाणी न्यूजची आमदार प्रा. राम शिंदे यांनी घेतली दखल; एका फोनवर तपनेश्वर रोड डिपीचा गंभीर प्रश्न लावला मार्गी..
Next Article डाँ. जाहेद बागवान यांचा हिंदु-मुस्लिम एकतेवर आनोखा उपक्रम;सर्वच क्षेत्रातून होते कौतुक.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.