महालोकवाणी न्यूज:-
अंमळनेर :दि. 23
अंमळनेर ग्रामपंचायत ची नुकतीच निवडणूक पार पडली .जनतेने कौल दिला आहे . तो सर्वानी स्वीकारला पाहिजे . नवीन सरपंचांनी पद स्वीकारण्या पूर्वी गेल्या पंच वार्षिक चा संपूर्ण हिशोब घ्यावा व गावातील चौकात हिशोबाचे फ्लेक्स लावावेत अशी मागणी प्रा.बाळासाहेब पवार यांनी केली आहे.
ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी बिनविरोध चा घाट घातला गेला परंतु तो उधळून लावण्यात आला . सत्ताधारी पॅनल ने त्यांच्या दरबारात सर्व ठरवले होते . परंतु गावाकऱ्यांनी एकत्र येत निवडणूक लढवली व अंमळनेर गावात चार जागा जिंकल्या आहेत . मिसळवाडीत प्रचंड दहशत असताना तेथील मतदारांनी दहशती विरुद्ध कौल दिला परंतु अंमळनेर च्या इंदिरा नगर मधून एकतर्फी मतदान घेण्या साठी साम दाम चा वापर करण्यात आला व मिसळवाडी तील परिवर्तन थोपवले असले तरी स्वाभिमानाची मशाल पेटली आहे. हा सत्ते विरुद्ध चा संघर्ष आहे .
मागची पंचवार्षिक निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली होती . त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन कारभार अपेक्षित होता . परंतु कारभारात कोणतीही परदर्शकता ठेवली नाही. कोणत्या योजनेला किती निधी आला . तो कोणत्या कामावर खर्च केला . याची ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा माहिती नाही . जेष्ठ नेते व सरपंच यांनी काही योजना वरच्या वर गायब केल्या अशी चर्चा सदस्य करत आहेत . परंतु दहशती मुळे बोलत नाहीत. परंतु इथून पुढे हे चालणार नाही .ग्रामसभा व मासिक मिटिंग घ्याव्या लागतील फक्त सह्या घेऊन चालणार नाही .
प्रत्येक योजनेचा होशोब गावापुढे मांडावा लागेल . शेत तळी व विहिरी ,घरकुल यांचे बिल काढतांना किंवा रोहयो ची बिले काढतांना कोणीही एजंतगिरी करू नये असा इशारा प्रा. पवार यांनी पत्रकात दिला आहे .
स्वतः निवडून आलेल्या सदस्यांनी मीटिंगला हजर राहून निर्णय घ्यावेत जर त्यांच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप केला तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते हे सुद्धा लक्षात घ्यावे महिलांना पद मिळाले आहे त्यांना सन्मान सुद्धा मिळावा यासाठी आपण संघर्षाची भूमिका घेऊ असे ही पत्रकात म्हटले आहे.
