मुलांनी अशिष येरेकर यांच्या प्रमाणे अभ्यास करून अधिकारी व्हावे- ॲड डॉ अरुण जाधव
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. मोहा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या निवारा बालगृहातील अनाथ- निराधार विद्यार्थ्यांना ५० डझन वह्या आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाचे संचालक ॲड. डॉ. अरूण जाधव,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. माने, कैलास खैरे, सिद्धनाथ भजनावळे, सुनील मिसाळ, केंद्रप्रमुख मल्हारी पारखे सर, मुख्याध्यापक हपटे सर, शिक्षक रजनीकांत साखरे, निवारा बालगृहाचे संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की,निवारा बालगृहातील मुले मोहा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकतात. या मुलांचे पालकत्व ॲड. अरुण (आबा) जाधव यांनी घेतले आहे. तसेच बोलताना ॲड डॉ अरुण जाधव म्हणाले की, मुलांनी अभ्यास करून मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांच्या प्रमाणे अधिकारी व्हावे.यावेळी येरेकर यांना निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
