Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » युवा आमदार रोहित पवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर विधीमंडळाकडून नियुक्ती..

युवा आमदार रोहित पवार यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर विधीमंडळाकडून नियुक्ती..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड। सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘युपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु हा निर्णय लगेचच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची व्यक्तीशः भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली. परिणामी सरकारला विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागला. तसेच पुण्यात विश्रांतवाडी येथील बांधकाम पूर्ण झालेले शासकीय वसतीगृह तातडीने सुरु करण्याचा विषयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अडचणी दूर करण्याच्या विषयावरही त्यांनी आवाज उठवला आहे.

याशिवाय वेगवेगळ्या पद भरती परिक्षेतील घोळ, पदवी ( Degree) आणि तत्सम अभ्यासक्रमाच्या तारखा, पदभरती, परिक्षा रद्द होणे, त्यातील चुकीच्या अटी, गोंधळ अशा अनेक विषयांवर आमदार रोहित पवार यांनी सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारसह आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. त्यामुळे रोहित पवार यांची विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच क्रेझ असल्याचेही पहायला मिळते.

त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातही त्यांनी शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत करुन जिल्हा परिषदेच्या ४०० शाळा डिजिटल केल्या आहेत. तसेच आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती आणि ‘सीएसआर’च्या माध्यमातूनही त्यांनी मतदारसंघात शिक्षणासाठी मोठा निधी आणला. आता राज्य शासनाने त्यांची थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती केल्याने कर्जत-जामखेडपासून तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात शिक्षणावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. याबाबतचे पत्र विधानमंडळ सचिवालयाने नुकतेच त्यांना दिले आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह भाजपाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांचीही सिनेटवर नियुक्ती झाली आहे.

आमदार रोहित पवार यांची नुकतीच ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुणे विद्यापीठाच्या ( pune University ) सिनेटवर नियुक्ती झाल्याने रोहित पवार यांचे राजकीय वजन वाढत चालल्याचे दिसत आहे.

आमदार रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

‘‘माझ्या पक्षाने आणि विधिमंडळाने माझ्यावर विश्वास टाकत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षाचा, विधानमंडळाचा आणि अध्यक्ष राहुल जी नार्वेकर यांचा आभारी आहे. अभ्यासक्रमापासून, परिक्षा शुल्क, वसतीगृह, स्कॉलरशीप, ॲडमिशन असे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. याबाबत माझी विद्यार्थ्यांसोबत नियमित चर्चाही होत असते. पुढील काळात हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील.’’

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड कन्या विद्यालयात आई – वडिलांना गुलाब पुष्प देवून व्हँलटाईन साजरा केला
Next Article अहमदनगरचे जिल्हाधिकारी बदलले; नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्री.सिद्धराम सालीमठ यांची निवड !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.