Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राम शिंदेचे पुन्हा कर्जत-जामखेड मतदार संघात वर्चस्व; रोहित पवार बॅकफूटवर.!

राम शिंदेचे पुन्हा कर्जत-जामखेड मतदार संघात वर्चस्व; रोहित पवार बॅकफूटवर.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 11, 2023Updated:June 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. यामध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे, समान मते असतांना सभापती आणि उपसभापती हे भारतीय जनता पक्षाचे झाले, यामध्ये आमदार राम शिंदेचा जादुई करिष्मा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कर्जत – जामखेड या मतदार संघात राम शिंदेंचे वर्चस्व प्रस्थापित होतांना दिसत आहे. मतदार राम शिंदेंना पसंती देतांना पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात या सर्व बाबींचा राम शिंदे यांना नक्कीच फायदा होणार आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांचे गटाचे नऊ सदस्य तर आमदार रोहित पवार गटाचे नऊ सदस्य, अशी समसमान संख्या असतानाही राम शिंदे गटाचे सभापती आणि उपसभापती विजयी झाले.

कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, यात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. शिंदे गटाचे सभापती पदाचे उमेदवार काकासाहेब तापकीर यांना नऊ मते मिळाली. तर रोहित पवार गटाचे सभापती पदाचे उमेदवार यांना आठ मते मिळाल्याने ते पराभूत झाले, एक मत अवैध ठरल्याचे निवडणूक प्रक्रियेत दिसून आले.

उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे पाटील अभय पांडुरंग यांना दहा मते मिळाली त्यामुळे ते विजयी झाले. तर रोहित पवार गटाचे उमेदवार श्रीहरी कैलास शेवाळे यांना आठ मते मिळाल्याने ते दोन मतांनी पराभूत झाले. यामुळे पवार यांच्या गटाचे एक मत फुटल्याचे स्पष्ट होत आहे. सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेनंतर एक मत बाद झाल्याचे स्पष्ट झाले. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या गटाचे नऊ सदस्य असतानाही आठच मते मिळाल्याने पवार गटाचा सदस्य फुटल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

राम शिंदे यांनी जामखेड पाठोपाठ कर्जत मधील ही बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये घेत रोहित पवार यांना धोबीपछाड दिली आहे. जामखेड बाजार समिती निवडणुकीत राम शिंदे व रोहित पवार यांच्या दोन्ही पॅनलचे नऊ-नऊ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ईश्वर चिट्ठीच्या आधारे निर्णय घेण्यात आला. त्यात शिंदे गटाचे उमेदवार हे सभापती पदी निवडून आले. त्यानंतर आज कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिंदे यांनी मतांच्या गणितात बाजी मारत पवार यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.यामुळे आमदार रोहित पवार कुठे तरी बॅकफूटवर जातांना पाहायला मिळत आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअहमदनगरचे भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी यांना त्वरित निलंबित करा; अन्यथा मंत्रालया समोर आत्मदहन करणार – राजेंद्र शिंदे.!
Next Article पती हत्येच्या गुन्ह्याखाली तुरुंगात होता. ८ महिन्यांची गर्भवती पत्नी त्याला भेटायला गेली मात्र, ही भेट अखेरची ठरली. तुरुंगात पत्नीसोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.