Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रितेश – जेनिलियाची ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी आहे, ‘या’ साऊथ सिनेमाची रिमेक कहाणी !

रितेश – जेनिलियाची ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी आहे, ‘या’ साऊथ सिनेमाची रिमेक कहाणी !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 16, 2022Updated:December 16, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अभिनेता रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी जेनिलिया देशमुख पहिल्यांदाचं एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2012 मध्ये रितेश आणि जेनिलिया यांनी लग्न केलं. त्यानंतर जवळपास 10 वर्षांनी दोघेही पहिल्यांदा एकत्र मराठी सिनेमात दिसणार आहेत. रितेश आणि जेनिलिया यांच्या वेड या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान आता हा सिनेमा ओरिजिनल नसून साऊथ सिनेमाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं या चर्चांमागचं कारण काय ?

वेड टीझरनंतर सिनेमासाठी उत्सुकता चांगलीचं वाढली होती. दरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. जेनिलिया, रितेशबरोबरच सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, साऊथ अभिनेत्री जिया शंकर प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान अभिनेत्री जेनिलिया या सिनेमाची निर्माती आहे तर रितेश देशमुखनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दोघेही पहिल्यांदाच निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे जेनिलिया देशमुख वेड सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत आपलं पदार्पण करणार आहे. या ट्रेलरमधून जिनिलियाच्या मराठी संवादांनी तर चाहत्यांना भुरळ घातली आहे..

टीझर आणि ट्रेलरला पसंती मिळत असताना दुसरीकडे मात्र, रितेश आणि जेनिलियाचं हे वेड ओरिजनल नसल्याच्या चर्चा होत आहेत. वेड हा सिनेमा साऊथ सिनेमाचा मराठी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना कारण ठरलं आहे ते म्हणजे टीझर आणि ट्रेलरमधील काही सीन्स. जे सीन्स ‘मजिली’ या साऊथ सिनेमाशी तंतोतंत मिळते जुळते आहेत. दरम्यान त्या सीन्स बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर.. वेड सिनेमाच्या टीझरच्या शेवटी जेनिलिया छत्री घेऊन उभी आणि रितेश तिच्यासमोर सिगरेट पेटवताना दिसत आहे. हाच सीन मजिली सिनेमातही आहे.

तसंच दोन्ही सीन्समधील कलाकारांचे कॉस्ट्युम्सही सारखे आहेत. मजिली आणि वेड सिनेमातील हे दोन सारखे सीन्स एकत्र करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत. यावरून वेड हा मजिली या साऊथ सिनेमाचा मराठी रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. पण रितेश आणि जेनिलिया यांच्याकडून मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान चाहत्यांना ‘वेड’चा ट्रेलर विशेष आवडला आहे. महाराष्ट्राचे आवडीचे कपल या सिनेमात असल्याने, रिमेक असला तरी आम्ही हा सिनेमा पाहू असा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Next Article सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो? त्यामागचं नेमकं लॉजिक तरी काय?
    mahalokwani
    • Website

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.