महालोकवाणी न्यूज दिनांक. 23
माऊली संकुल येथे लिटिल फ्लावर स्कूलच्या तीनही शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश लहान मुले यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून समाजाला देण्याचा प्रयत्न केला. व त्याचे रक्षण करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश यू.के.जी. च्या मुलांनी एका नाट्यद्वारे सर्वांना दिला . तर वृक्षाची तोड थांबवावी आणि नैसर्गिक ऑक्सिजनची वाढ करावी, हा संदेशही नाटकाद्वारे उपस्थित यांना देण्यात आला.

पशु ,पक्षी , पाणी , पर्वत , चंद्र सूर्य , तारे , धरती , आकाश या सर्व नैसर्गिक संपत्तीचे नृत्याच्या माध्यमातून पालक वर्गाना सांगण्याचा प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात केला होता.
या वार्षिक स्नेह संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पियुष खंडेलवाल बालरोग तज्ञ यांनी अध्यक्ष पद भूषविले तर श्रीमती .मंगला मुथा शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपमेंट यांनी प्रमुख अतिथींचे स्थान भूषविले तर सी.ए. विजय मर्दा हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहिले

विजय मर्दा यांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमाचे खूप कौतुक केले व त्यांच्या मुलाचे बालपण लिटल फ्लावर स्कुल मध्येच गेल्याच्या सांगितले ह्या शाळेचा इतका फायदा व इतकी, यशस्वी वाटचाल मुलांचे भविष्य उज्वल झाल्याशिवाय राहत नाही त्यांचा मुलगा फायनल सीए होऊन स्वतःची प्रॅक्टिस करीत आहे.
डॉ. पियुष खंडेलवाल यांनी देखील सर्व शिक्षक वर्गाचे खूप खूप कौतुक केले कारण दोन ते सहा वयोगटाकडून एवढे उपक्रम करून घेणे म्हणजे खूप कष्टाचे व कौशल्याचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हनुमंत भुतकर व सारिका भूतकर यांनी ही शाळेच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या
आभार प्रदर्शन सूत्रसंचालन राधिका कल्याणी यांनी केले पाहुण्यांचे स्वागत विशाल बोगावत व मनीषा बोगावत यांनी केले कार्यक्रम मागच्या यशस्वीतेसाठी तिनही शाखेच्या शिक्षकांनी व कर्मचारी वर्गांनी खूप परिश्रम घेतले त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला
