Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (१८ जून) रोजी गहिनाथ गडावरून पंढरपुर कडे प्रस्थान.!

वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (१८ जून) रोजी गहिनाथ गडावरून पंढरपुर कडे प्रस्थान.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 18, 2023Updated:June 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:
श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ वारी साठी संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (१८ जून) दुपारी गहिनाथ गडावरून पंढरपुर कडे प्रस्थान झाली आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत हभप श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथुन संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी बरोबर दरवर्षी जवळपास ५० ते ६० हजार वारकरी या दिंडीत सहभागी होत असतात.

श्रीगहिनीनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांचा गुरुपरंपरेनुसार अभिषेक होईल त्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे दुपारचे भोजन झाल्यानंतर दुपारी दोन ते चार दरम्यान गहिनीनाथ गड येथून अतिशय उत्साहात या भव्य दिव्य दिंडीचा पुढील प्रवास सुरू होईल.


त्यानंतर निवडुंगा येथे पहिला मुक्काम होणार आहे. सोमवारी १९ जूनला वाहली, सावरगाव, वनवेवाडी असा प्रवास करत मातकुळी ता.आष्टी येथे दींडीचा दुसरा मुक्काम होईल. त्याचप्रमाणे मंगळवारी २० जूनला जांबवाडी जामखेड जगदाळे वस्ती असा प्रवास झाल्यानंतर संत वामनभाऊ गड जमादारवाडी येथे दिंडीचे प्रमुख आकर्षण असलेले पहिले गोल रिंगण होईल व सारोळा येथे दींडीचा मुक्काम होईल.

बुधवारी २१जूनला सारोळा वस्ती, खुर्दैठण, घोडेगाव, आपटी, पिंपळगाव वस्ती, असा प्रवास करून पिंपळगाव उंडा येथे दिंडी मुक्कामास पोहोचेल. गुरुवारी २२ जूनला सकाळी पिंपळगाव वस्ती, जवळके, जाधव वस्ती, शिंदे वस्ती चिंचपूर मशिदीचे व भिलारे वस्ती, पांढरेवाडी, आटोळे वस्ती, शेळगाव असा प्रवास करून तांदळवाडी येथे मुक्काम करेल. शुक्रवारी दिनांक २३ जून रोजी देऊळगाव, डोणजे कसाबाचे, बंगाळवाडी असा प्रवास करून मिरगव्हाण येथे मुक्काम करील. शनिवारी २४ जून रोजी मिरगव्हाण वस्ती, नागोबाचे हिवरे, सालसे, आळसुंदे वस्ती असा प्रवास करून वरकुटे मूर्तीचे येथे दिंडीचा मुक्काम होईल. रविवार दिनांक २५जून रोजी वरकुटे येथून दिंडीचा पुढील प्रवास सुरू होऊन रोपळे, असा प्रवास झाल्यानंतर आठरे येथे दिंडीचे दुसरे महत्वाचे रिंगण होईल.

त्यानंतर भोगेवाडी वस्ती, भोगेवाडी येथे मुक्काम होईल. सोमवार दिनांक २६ जून रोजी ढवळस, पिंपळखुंटे, अंबड, शिराळाचे गोठे, भेंड असा प्रवास करून संत सावता महाराज यांचे श्रीक्षेत्र आरण येथे दिंडीचा मुक्काम होईल. मंगळवार दिनांक २७ जून रोजी बारडी, जाधव वाडी, पवार वस्ती फाटा, मेंढापूर पाटील वाडा असा प्रवास करून पादुका रिंगण होईल व दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी दाखल होईल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशेतकऱ्यांसाठी शेवटची संधी; कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी वाचा सविस्तर माहिती आणि असा करा अर्ज.!
Next Article उघडा डोळे बघा नीट जामखेड महावितरणचा भोंगळ कारभार .!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.