Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » विखे-पिता पुत्र व राम शिंदेंचा संघर्ष; मग पवारांना साथ देतंय तरी कोण ? वाचा सविस्तर..

विखे-पिता पुत्र व राम शिंदेंचा संघर्ष; मग पवारांना साथ देतंय तरी कोण ? वाचा सविस्तर..

mahalokwaniBy mahalokwaniMay 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : बाजार समिती निवडणुकीत आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाला समसमान प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. सभापती उपसभापती निवडीतही सभापती शिंदे गटाचा तर उपसभापती पवार गटाचा झाला.

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही राम शिंदे आणि रोहित पवार गटाचे समसमान 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली.

जामखेडमध्ये पैशापुढं माणुसकी हरली; लैंगिक अत्याचारी जोमात, आमदार, नेते आणि जामखेडकर अजूनही कोमात..?

आमदार रोहित पवार व खासदार सुजय विखे यांचेच एकत्रित पॅनलचे हे उमेदवार होते. आम्ही दिड महिना याच्यावर कोठे भाष्य केले नाही. शेवटच्या क्षणी का होत नाही आम्ही सत्तेत आहोत. आमचे आमदार आहेत, आमचे खासदार आहे, मंत्री आहे, आमची राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे. पण विखे ज्या पक्षात असतात त्या पक्षाच्या विरोधी काम करतात, असं लोक सांगत होते त्याचा प्रत्येक आज आम्हाला आला, असेही आ. राम शिंदे यांनी बोलून दाखविले.

जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार, विखे आल्यानंतर तीनच उमेदवार

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत सुजय विखे हे भाजपमध्ये आले आणि खासदार झाले. विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्यासह मोनिका राजळे, बबनराव पाचपुते हे तिघेच निवडून आले. विखे नसताना जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार होते. जिल्हा भाजपमय होता. विखे आल्यानंतर विखेंसह तीनच उमेदवार निवडून आले. विखेंमुळे उमेदवार पडल्याचा आरोप राम शिंदे, शिवाजी कर्डिलेंसह इतरांनी केला होता.

जामखेडकर लैगिक शोषणाविरुद्ध गप्प का ? आमदारांनी का केले मौन धारण; मित्र पत्रकारांची आरोपीला जामीन मिळवण्यासाठी धडपड.!

दुसऱ्या पक्षातून आलेल्या विखेंना भाजपने दिले मोठे पद

महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने वाद थंड झाला होता. त्यानंतर राम शिंदे हे विधानपरिषदेवर गेले. भाजप-शिंदे गट अशी सत्ता आल्यानंतर राधाकृष्ण विखे यांना दोन नंबरचे महसूलमंत्रीपद मिळाले. दुसऱ्या पक्षातून आलेल्या विखेंना भाजपने मोठे पद दिले. याबाबत भाजपच्या काही नेत्यांमध्ये खदखद आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांची गळचेपी होताना दिसत आहे.

शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरून विखेंना डिवचले

मध्यंतरी राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर शिंदे यांनी विखेंना डिवचले आहे. विखे आताच भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना भाजप समजू घ्यायला वेळ लागेल, असे शिंदे म्हणाले. गेल्या महिन्यात राम शिंदे यांनी लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. आता थेट जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत विखे-पिता पुत्र व शिंदेंचा संघर्ष पुन्हा उघडकीस आले.

विखे सुद्धा राम शिंदेंवर टीका करतात का ? शिंदेंनी केलेल्या तक्रारीवर पक्षश्रेष्ठी काय कारवाई करणार का ? हे आता येत्या काळात समजेल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleiPhone 14 Plus महाबंपर ऑफर; तुम्हीही खरेदी केल्याशिवाय राहणार नाहीत.! किंमत फक्त..
Next Article कर्जत- जामखेड एमआयडीसीची अधिसूचना जाहीर करा; अन्यथा या दिवशी हजारोंच्या संख्येने उपोषणाला बसणार- आमदार रोहित पवार
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.