Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे- मा.आ.भिमराव धोंडे.

विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे- मा.आ.भिमराव धोंडे.

mahalokwaniBy mahalokwaniMay 14, 2023Updated:May 14, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी वार्षिक स्नेहसंमेलन उडान -२०२३ उत्साहात संपन्न

आष्टी प्रतिनिधी – गोरख मोरे

आष्टी येथील श्री. छत्रपती, शाहू , फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय येथे वार्षिक स्नेह संमेलन‌‌ उडान-2023 शनिवार दि.12.05.2023 रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. भिमराव धोंडे साहेब हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजयदादा धोंडे, श्री. अभयराजे धोंडे, प्शासन अधिकारी डॉ.डि बी. राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथीं यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्नेहसंमेलन निमित्त महाविद्यालंतर्गत घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे पुरस्कार वितरण सोहळा अध्यक्षांच्या हस्ते संपन्न झाला. स्नेहसंमेलन निमित्त आयोजित क्रीडा स्पर्धामध्ये मुलांसाठी क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल तसेच मुलींसाठी बॅडमिंटन, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये विजेता संघास पारितोषक म्हणून प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आली. महाविद्यालयाच्या शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. जी.जे. नवसारे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने कु. कद्धीयाम तेजा या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2022 – 23 करिता उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड केली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. एम.ए. आजबे यांच्या सूचनेनुसार कुमारी गीते ऋतुजा हिची उत्कृष्ट सेवक म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही विद्यार्थ्यांचा अध्यक्षांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महाविद्यालयाने स्थापनेपासून आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा प्राचार्यांनी उपस्थितांसमोर मांडला. महाविद्यालयांमधून अठरा बॅचेस स्थापनेपासून उत्तीर्ण होऊन गेले आहेत. महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या अनेक कार्यालयामध्ये, बँकांमध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये विविध पदावर यशस्वीरित्या काम करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वतःची कृषी सेवा केंद्रे स्थापन केली आहेत व काही विद्यार्थी शेतमाल प्रक्रिया उद्योगामध्ये काम करत आहेत. हे सर्व शक्य होण्याचे कारण म्हणजे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी राबविलेल्या शैक्षणिक उपक्रम पद्धती व वेळोवेळी संस्थापक अध्यक्ष व प्रशासन मंडळ यांचे लाभलेले मार्गदर्शन आहे. अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना मा. भीमराव धोंडे साहेब यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये कृषी पदवीधारकांचा घटलेला टक्का याच्यावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना साहेबांनी सांगितले की आजच्या स्पर्धेचे युगामध्ये जर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमावेळी स्पर्धा परीक्षांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे.‌ याकरिता साहेबांनी प्राचार्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र महाविद्यालयामध्ये स्थापन करण्याच्या सूचना केल्या.

शैक्षणिक वाटचाली सोबतच विद्यार्थिनींच्या विविध सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयातर्फे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या उत्साहपूर्ण कार्यक्रमात विविध नृत्यप्रकारात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध भाषेतील गाजलेल्या गाण्यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमांमध्ये तेलंगणा राज्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारे नृत्याचे सादरीकरण करून प्रथम पुरस्कार पटकावला. तसेच गीत गायन, रॅम्पवॉक, ह‌स्य कविता अशा एकूण 27 कला प्रकारांचे दिमाखदार पध्दतीने सादरीकरण केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्नेहसंमेलनातील उत्स्फूर्त सहभागाबद्दल प्रमुख अतिथी डॉ. अजयदादा धोंडे, श्री. अभयराजे धोंडे, डॉ.डी.बी.राऊत यांनी अभिनंदन व्यक्त करून विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक केले. स्नेहसंमेलन यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाला आनंद शैक्षणिक संकुल मधील‌ सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलन अंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धांचे काम प्रा. एस.आर. देसाईपाटील यांनी पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. एल.एस. मिसाळ व आभार प्रा.आय. एम. तांबोळी यांनी मानले. आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम याचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार शैलेश पवार व विद्यार्थिनी कुमारी गीतांजली येवले यांनी केले तसेच आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस. एल.बनकर यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी; शंभुराजे कुस्ती संकूलाच्या वतीने आयोजन
Next Article जामखेडकर लैगिक शोषणाविरुद्ध गप्प का ? आमदारांनी का केले मौन धारण; मित्र पत्रकारांची आरोपीला जामीन मिळवण्यासाठी धडपड.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.