महालोकवाणी न्यूज:- संपादक सचिन कांबळे
मुबंई प्रतिनिधी:-
फुंडे:-दिनांक-२५ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना, राज्यशास्त्र विभाग तहसील कार्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.२५ जानेवारी १९५० ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली.२५ जानेवारी २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.श्री.अंबादास यादव (सहायक मॅनेजर,(HR) ऑल कार्गो) यांनी आपल्या मनोगतातून भारतीय लोकशाही बळकट करायची असेल तर,आजचा नागरिक सुजाण मतदार व्हायला हवा.

पहिल्यांदा अशा प्रकारे साजरा झाला प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कशी सुरू झाली परंपरा..
मतदानाचा टक्का वाढला पाहिजे,सर्व मतदारांनी हक्क म्हणून मतदान करायला पाहिजे.डॉ.संदिप घोडके,राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी आपल्या प्रस्ताविकातून राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि मतदारांची कर्तव्य याविषयी सविस्तर मांडणी केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा.प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांनी आपल्या मनोगतातून संविधान,राष्ट्रीय निर्वाचन आयोग व आजचा मतदार याविषयी विचार मांडले.मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येक मतदाराने जबाबदारीपूर्वक मतदान केले पाहिजे.
3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
लोकशाही प्रक्रियेत मतदार व्यक्तीला अनन्य साधारण महत्व आहे.कार्यक्रमासाठी प्रा.राम गोसावी,प्रा.प्रांजल भोईर,डॉ.रत्नमाला जावळे उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रिकेचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत
गोतपागर यांनी केले.प्रा.चिंतामण धिंदळे यांनी आभार मानले.
